एक्स्प्लोर
Birthday Special : राणा दाच्या पाठक बाईंचा आज वाढदिवस; अभिनेत्री अक्षया देवधरचे हटके फोटो
Akshaya_Deodhar_00
1/7

'तुझ्यात जीव रंगला' या झी मराठीवरील लोकप्रिय मालिकेतील पात्रांनीही प्रेक्षकांच्या मनात घर केलं. या मालिकेतून घराघरात पोहोचलेला लोकप्रिय चेहरा म्हणजे राणा दाच्या पाठक बाई. म्हणजेच, अभिनेत्री अक्षया देवधर. (Photo Credit : @akshayaddr/Instagarm)
2/7

आज अभिनेत्री अक्षया देवधरचा वाढदिवस. अक्षया आपल्या क्लासी लूक आणि ग्लमरस अंदाजामुळे सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये नेहमीच चर्चेत असते. (Photo Credit : @akshayaddr/Instagarm)
3/7

उत्तम अभिनय आणि सौंदर्यामुळे अक्षया अनेकांच्या मनावर राज्य करते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अक्षया नेहमीच सोशल मीडियावर तिचे फोटो अन् व्हिडिओ शेअर करत असते. (Photo Credit : @akshayaddr/Instagarm)
4/7

अक्षराला खरी ओळख 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून मिळाली. राणा दादा आणि पाठक बाईंच्या जोडीला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती. (Photo Credit : @akshayaddr/Instagarm)
5/7

सध्या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी या मालिकेतील व्यक्तीरेखांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. (Photo Credit : @akshayaddr/Instagarm)
6/7

मालिकेतील अंजली या व्यक्तिरेखेला मिस करत असल्याचं स्वतः अक्षयानं काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत सांगितलं होतं. (Photo Credit : @akshayaddr/Instagarm)
7/7

अक्षया देवधर हिने अमेय वाघ नाटक कंपनीद्वारे तिच्या रंगमंचावरील कारकिर्दीला सुरुवात केली होती. परंतु, तिला खरी ओळख 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून मिळाली. (Photo Credit : @akshayaddr/Instagarm)
Published at : 13 May 2021 01:43 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
वर्धा
बातम्या
करमणूक
महाराष्ट्र























