एक्स्प्लोर
Lok Sabha Election Results 2024 : महाराष्ट्रातील भाजपाचे विजयी उमेदवार!, पाहा संपूर्ण यादी..
Lok Sabha Election Results 2024 : लोकसभा निवडणुकीच्या निकालाचं चित्र स्पष्ट होतंय. शिवसेना-राष्ट्रवादीच्या फुटीनंतर झालेली ही पहिलीच निवडणूक आहे. महाराष्ट्रातील भाजपाचे विजयी उमेदवार कोण? यादी पाहा

Maharashtra Lok Sabha Election Results 2024 BJP winning candidates marathi news
1/9

पुणे लोकसभा मतदारसंघाचा निकाल लागला असून त्या ठिकाणी भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांनी बाजी मारली आहे. मोहोळ यांनी काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांचा पराभव केला आहे.
2/9

नागपूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे नेते आणि विद्यामन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे यांना पराभूत केलंय. नितीन गडकारींनी 1,07,926 मतांनी आघाडी मिळवत विजय मिळवला आहे.
3/9

पालघरमध्ये भाजपचे डॉ. हेमंत सावरा विजयी झाले आहेत. महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाकडून भारती कामडी आणि बहुजन विकास आघाडीकडून राजेश पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात होते. सावरा यांनी 147300 अशी निर्णायक मोठी आघाडी घेतली
4/9

भाजपचा बालेकिल्ला असलेल्या उत्तर मुंबईतून पीयूष गोयल यांनी काँग्रेसचे उमेदवार भूषण पाटील यांचा एक लाखाहून अधिक मताधिक्याने पराभव केला आहे
5/9

जळगाव मतदारसंघात भाजपने आपला गड राखला असून महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ या विजयी झाल्या आहे. दीड लाखापेक्षा जास्त मताधिक्याने विजय
6/9

रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या रक्षा खडसे यांनी हॅट्रिक करत विजय प्राप्त केला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार राष्ट्रवादीचे श्रीराम पाटील यांचा पराभव केला.
7/9

त्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बाजी मारली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांचा पराभव झालाय.
8/9

सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपचे अखेर उदयनराजे भोसले यांनी आघाडी घेतली आहे. शशिकांत शिंदे 13 व्या फेरीनंतर पिछाडीवर गेले
9/9

अकोल्यातून भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या डॉ. अभय पाटील यांचा पराभव केलाय. शिवाय वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर देखील पराभूत झाले आहेत
Published at : 04 Jun 2024 06:35 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
अहमदनगर
क्रीडा
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
