एक्स्प्लोर
घरासमोर 50 रोल्स रॉयस, 1000 कोटीच्या हिऱ्याचा पेपरवेट म्हणून वापर, भारताचे पहिले अब्जाधीश कोण होते?
मीर उस्मान अली खान हे कोणे एके काळचे अब्जाधीश होते. त्यांच्या श्रीमंतीची चर्चा ही परदेशातही केली जायची. त्यांच्याकडे एकूण 50 रोल्स रॉयस कार होत्या, असं म्हटलं जातं.

mir osman ali khan wealth (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क)
1/10

मुंबई : प्रत्येकालाच श्रीमंत व्हावेसे वाटते. जगातील सर्व सुखसोई आपल्या पायाजवळ असाव्यात असे प्रत्येकालाच वाटते. पण हे सुख प्रत्येकाच्या नशिबी नसते. भारतात मात्र आजही असे अनेक अब्जाधीश आहेत, जे आज हे सुख उपभोगतात.
2/10

भारतात याआधीही असे अनेक श्रीमंत लोक होऊन गेले आहेत, ज्यांची नावं आजही आदराने घेतली जातात. यामध्ये उस्मान अली खान (Mir Osman Ali Khan) हे नाव असे आहे, ज्याचे नावे घेताच त्यांच्या श्रीमंतीच्या अनेक कथा ऐकवल्या जातात.
3/10

त्यांच्याकडे एवढी संपत्ती होती की, सामान्य माणसाला त्याची कल्पनाही करणं कठीण आहे. ते हैदराबाद संस्थानचे शेवटचे निजाम होते. असं म्हटलं जातं की त्यांच्याकडच्या संपत्तीचे मूल्य हे 1 लाख 91 हजार 987 कोटी रुपये (230 अब्ज डॉलर्स ) एवढे होते.
4/10

त्यांच्या याच श्रीमंतीमुळे इस्ट इंडिया कंपनीकडून त्यांना भारताचे पहिले आणि सर्वांत श्रीमंत अब्जाधीश असे म्हटले जात असे.
5/10

निजाम उस्मान अली खान यांच्या श्रीमंतीची चर्चा विदेशातही झालेली आहे. टाईम्ससारख्या प्रसिद्ध नियतकालीकांनी त्यांच्या या श्रीमंतीवर लेख लिहिलेले आहेत. त्यांची संपत्ती ही अमेरिकेच्या एकूण जीडीपीच्या दोन टक्के होती, असं म्हटलं जायचं.
6/10

निजामकाळात गोवळकोंडा येथील खाणी याच उस्मान अली खान यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत होत्या. याच खाणींमधून हिरे मिळायचे. जगभरात याच खाणींमधून हिऱ्यांचा पुरवठा केला जायचा.
7/10

1724 ते 1948 पर्यंत हैदराबाद संस्थानावर निजामांची सत्ता होती. म्हणजेच निजामांनी एकूण 224 वर्षे शासन केलं होतं. निजाम हे वेगवेगळ्या कारणांमुळे प्रसिद्ध होते.
8/10

मीर उस्मान अली खान हे प्रचंड श्रीमंत होते. त्यांच्या श्रीमंतीचे अनेक किस्से आजही चवीने सांगितले जातात. त्यांच्याकडे त्या काळात एकूण 50 रोल्स-रॉयस कार होत्या असे म्हटले जाते. तब्बल 1000 कोटी रुपये मूल्य असलेल्या हिऱ्याचा ते पेपरवेट म्हणून वापर करायचे.
9/10

त्यांच्याजवळ 400 दशलक्ष पौंड किमतीचे दागिने होते. त्यांच्याकडे कोह-ए-नूर, होप, दरिया-ए नूर, नूर-उल-ऐन, प्रिंसी, रीजेंट यासह अनेक मौल्यवान हिरे होते.
10/10

दरम्यान, एवढी श्रीमंती असूनही ते शालीन स्वभावाचे होते, असं म्हटलं जातं. ते एकदम साधे कपडे परिधान करायचे. त्यांना विकाजी बेकरीत तयार करण्यात आलेले उस्मानिया बिस्कीट फार आवडायचे, असे म्हटले जाते.
Published at : 29 Apr 2024 11:01 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
सोलापूर
बातम्या
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
