एक्स्प्लोर
Aadhaar Card : लहान मुलांसाठी आधार कार्ड काढायचंय? या ५ स्टेप्स लक्षात ठेवा!
भारतात जन्मलेल्या प्रत्येक नागरिकासाठी आधार कार्ड महत्त्वाचं आहे, मग तो बाळ असो किंवा प्रौढ.
आधार कार्ड
1/9

शाळा प्रवेशासाठी , सरकारी योजनांसाठी (उदा. बचत योजना, आरोग्य योजना), प्रवास किंवा पासपोर्टसाठी , बँक किंवा पिगी बँक अकाउंट उघडण्यासाठी आधार कार्ड असणं गरजेचं आहे.
2/9

बाळाच्या जन्मानंतर तत्काळ आधार कार्ड काढता येतं.
3/9

जन्माच्या ५ वर्षांपर्यंत बायोमेट्रिक माहिती आवश्यक नाही. ५ वर्षांनंतर बायोमेट्रिक (बोटांचे ठसे, डोळ्यांचे स्कॅन) अपडेट करणं बंधनकारक आहे.
4/9

लहान मुलाचं आधार काढताना या कागदपत्रांची आवश्यकता असते, बाळाचा जन्म दाखला ,आई किंवा वडिलांचा आधार कार्ड , पासपोर्ट साइज फोटो.
5/9

जाणून घेऊया ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रिया: स्टेप 1: UIDAI च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. (https://uidai.gov.in/)
6/9

स्टेप 2: ‘Book an Appointment’ या पर्यायावर क्लिक करा (मोठ्या शहरांमध्ये ही सेवा उपलब्ध आहे)
7/9

स्टेप 3: शहर/केंद्र निवडा बाळाचं नाव, जन्मतारीख, पालकांची माहिती भरा अपॉइंटमेंट बुक करा
8/9

स्टेप 4: दिलेल्या वेळेनुसार आधार केंद्रावर जा, आवश्यक कागदपत्रं सादर करा. फोटो व (जर वय ५ वर्षांपेक्षा जास्त असेल तर) बायोमेट्रिक प्रोसेस पूर्ण करा.
9/9

स्टेप 5: १४ ते २१ दिवसांत पोस्टाने किंवा ईमेलद्वारे e-Aadhaar मिळतो, तो UIDAI च्या वेबसाइटवरून डाउनलोडही करता येतो.
Published at : 08 Jul 2025 12:48 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























