एक्स्प्लोर

‘चप्पल चोर पाकिस्तान!’ कुलभूषण प्रकरणी अमेरिकेत घोषणाबाजी

कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबियांच्या अपमानाचे पडसाद आता अमेरिकेतही उठले आहेत. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमधील पाकिस्तानच्या दूतावासा बाहेर भारतीय आणि बलूच नागरिकांनी तीव्र निदर्शनं केली.

वॉशिंग्टन : कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबियांच्या अपमानाचे पडसाद आता अमेरिकेतही उठले आहेत. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमधील पाकिस्तानच्या दूतावासा बाहेर भारतीय आणि बलूच नागरिकांनी तीव्र निदर्शनं केली. यावेळी निदर्शन करणाऱ्यांच्या हातात ‘चप्पल चोर पाकिस्तान’चे बॅनर होते. याशिवाय, निदर्शकांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी करुन पाकिस्तानच्या कृतीचा निषेध केला. जाधव कुटुंबीयांना अपमानित करणं हे आधीच ठरलं होतं? गेल्या वर्षी 25 डिसेंबरमध्ये पाकिस्तानच्या तुरुंगात कैद असलेल्या कुलभूषण जाधव यांना भेटण्यासाठी त्यांच्या आई आणि पत्नी इस्लामाबादमध्ये गेल्या होत्या. या भेटीदरम्यान, पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी कुलभूषण जाधव यांच्या पत्नीला चप्पल काढायला लावलं होतं. इतकंच नाही तर दोघींनाही मंगळसूत्र, बांगड्या आणि टिकल्याही काढायला लावल्या होत्या. याशिवाय दोघींना त्यांचे कपडेही बदलण्यास सांगितलं होतं. तसेच, कुलभूषण यांच्याशी संवाद साधताना त्यांच्या आई आणि पत्नीला मातृभाषेत म्हणजेत मराठीत बोलू दिलं नाही. पाक मीडियाने लायकी दाखवली, कुलभूषण कुटुंबीयांना अपमानास्पद प्रश्न विशेष म्हणजे, पाकिस्तानचा नालायक पणा इतक्यावरही थांबला नाही. तर त्यांनी कुलभूषण जाधव यांच्या पत्नीचे चप्पला फॉरेन्सिक तपासासाठी ताब्यात घेतल्या. पण फॉरेन्सिक तपासात पाकच्या अधिकाऱ्यांना काहीही मिळालं नाही. या सर्व घटनेवर भारतीयांकडून संताप व्यक्त होत आहे. याचे पडसाद लोकसभेतही उमटले होते. लोकसभेत यावर निवेदन देताना, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला चांगलच खडसावलं होतं. तर आता या घटनेचे पडसाद अमेरिकेतही उमटत आहेत. ‘पाकिस्तान मुर्दाबाद’... कुलभूषण प्रकरणी शिवसेनेचा संसदेत एल्गार अमेरिकेत वसलेले भारतीय आणि बलूच नागरिकांनी पाकिस्तानच्या दूतावासाबाहेर सोमवारी निदर्शनं करीत, पाकिस्तानच्या कृतीचा निषेध केला. यावेळी निदर्शनं करणाऱ्यांच्या हातात चप्पल चोर पाकिस्तानचे बॅनरदेखील होते. शिवया, यावेळी पाकिस्तानविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. कुलभूषण यांच्या पत्नी आणि आईला पाककडून विधवेप्रमाणे वागणूक : स्वराज  दरम्यान, कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबियांचा अपमान करण्याचं षडयंत्र पूर्वीच शिजलं होतं अशी माहिती आता समोर येत आहे. दहशतवादी हाफिज सईदचा खास सहकारी आणि लष्कर ए तोयबाचा दहशतवादी आमीर हमजाने याबाबतचा धक्कादायक दावा केला आहे. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयने जाधव कुटुंबियांचा अपमान करायचं हे आधीच ठरवलं होतं, असं हमजाने म्हटलं आहे. संबंधित बातम्या आईवर भारतीय अधिकारी ओरडले, कुलभूषण जाधवांचा कथित व्हिडिओ  
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget