एक्स्प्लोर

Us Israel vs Iran War: जंग जंग पछाडून, नेतृत्व 24 तासात संपवूनही इराणमध्ये सत्तापालट शक्यच नाही! अमेरिकन गुप्तचर अहवालाने ट्रम्प कात्रीत

Us Israel vs Iran War: इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला असला तरी इराणमध्ये सत्ताबदल होण्याचे अमेरिकेचे स्वप्न अद्यापही पूर्ण होण्याची शक्यता कमी असल्याचे संकेत मिळत आहेत.

Us Israel vs Iran War: इराणविरोधात अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे हाती घेतलेल्या ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’ (Operation Epic Fury) या लष्करी मोहिमेमुळे मध्यपूर्वेतील परिस्थिती अधिक तणावपूर्ण झाली आहे. या मोहिमेदरम्यान इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात असला तरी इराणमध्ये सत्ताबदल होण्याचे अमेरिकेचे (America) स्वप्न अद्यापही पूर्ण होण्याची शक्यता कमी असल्याचे संकेत अमेरिकन गुप्तचर संस्थांच्या अहवालातून मिळत आहेत.

वॉशिंग्टन पोस्टच्या ताज्या अहवालानुसार, अमेरिकेने मोठ्या प्रमाणात हवाई आणि नौदल हल्ले केले असले तरी इराणची लष्करी आणि धार्मिक व्यवस्था अत्यंत मजबूत आणि संस्थात्मक स्वरूपाची असल्यामुळे केवळ लष्करी कारवाईतून ती कोसळणे कठीण आहे. अमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजन्स कौन्सिल (NIC) ने तयार केलेल्या अहवालात असे नमूद करण्यात आले आहे की, इराणमध्ये सत्तेचे हस्तांतरण करण्यासाठी आधीपासूनच ठरलेल्या प्रक्रिया आहेत. सर्वोच्च नेत्याच्या अनुपस्थितीतही त्या प्रक्रिया सुरळीतपणे कार्यरत राहू शकतात.

Us Israel vs Iran War: इराणची राजकीय व्यवस्था मजबूत

ब्रुकिंग्स इन्स्टिट्यूशनच्या तज्ज्ञ सुजॅन मलोनी यांच्या मते, इराणमधील राजकीय आणि धार्मिक संस्था अनेक दशकांपासून स्थिरपणे कार्यरत आहेत. अमेरिकेचा दबाव वाढला तरी या संस्था आपली अंतर्गत पकड टिकवून ठेवण्यास सक्षम आहेत. त्यामुळे बाह्य दबावातून त्वरित सत्ताबदल घडवून आणणे सोपे नाही.

Us Israel vs Iran War: उत्तराधिकाराची प्रक्रिया सुरू

दरम्यान, सर्वोच्च नेत्याच्या मृत्यूनंतर इराणमध्ये पुढील नेतृत्वाची निवड करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. धार्मिक परिषद मानली जाणारी असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्स पुढील सर्वोच्च नेत्याची निवड करणार आहे. या प्रक्रियेत इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. काही अहवालांनुसार, अली खेमी यांचे पुत्र मुजतबा खामेनेई हे पुढील नेतृत्वासाठी संभाव्य दावेदार मानले जात आहेत. मात्र, माजी वरिष्ठ नेते अली लारीजानी यांच्यासह काही राजकीय गट या शक्यतेला विरोध करत असल्याची चर्चा आहे.

Us Israel vs Iran War: ट्रम्प यांची इराणला धमकी

दुसरीकडे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावरून इराणने बिनशर्त आत्मसमर्पण करावे, अशी मागणी केली आहे. त्यांनी मुजतबा खामेनेई यांना अयोग्य ठरवत पुढील नेता निवडण्यात अमेरिकेची भूमिका असावी, असा सूचक इशाराही दिला आहे. ट्रम्प यांच्या या वक्तव्यावर इराणच्या संसद अध्यक्ष मोहम्मद बाकिर कलीबाफ यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. इराणचे भविष्य केवळ इराणी जनता ठरवेल, कोणत्याही बाह्य शक्तीला त्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही, असे त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे.

Us Israel vs Iran War: इराणमध्ये तातडीने सत्ताबदल होण्याची शक्यता कमी

दरम्यान, अमेरिका-इराण संघर्ष आता दुसऱ्या आठवड्यात प्रवेश केला असून त्याचा विस्तारही वाढत चालला आहे. हिंद महासागरापासून नाटो सदस्य असलेल्या तुर्कीच्या सीमांपर्यंत या संघर्षाचे पडसाद उमटत असल्याचे दिसत आहे. व्हाइट हाऊसच्या प्रवक्त्या अॅना केली यांनी इराणच्या सत्ताधारी व्यवस्थेवर मोठा दबाव निर्माण झाला असल्याचा दावा केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, इराणचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि अणुकार्यक्रम उद्ध्वस्त करणे हे अमेरिकेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

मात्र प्रत्यक्ष परिस्थिती काहीशी वेगळी असल्याचे गुप्तचर अहवालातून दिसून येते. आतापर्यंत इराणमध्ये मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन किंवा सुरक्षा दलांमध्ये फूट पडल्याचे कोणतेही संकेत दिसून आलेले नाहीत. तसेच इराणमधील विखुरलेला विरोधी पक्ष सध्या सत्तेची जबाबदारी स्वीकारण्याच्या स्थितीत नसल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. तज्ज्ञांच्या मते, इराणचे नेतृत्व अमेरिकेसमोर झुकणे त्यांच्या विचारसरणीच्या पूर्णपणे विरोधात आहे. त्यामुळे लष्करी कारवाई असूनही इराणमध्ये तातडीने सत्ताबदल होण्याची शक्यता कमी असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

आणखी वाचा 

Zohran Mamdani: न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांच्या घराबाहेर स्मोक बॉम्ब फेकत हल्ल्याचा प्रयत्न; पोलिसांनी सहा जणांच्या मुसक्या आवळल्या

महत्त्वाच्या बातम्या

Sonam Wangchuk Health Update: उपोषणावरती सोनम वांगचुक अद्यापही ठाम; डॉक्टरांनी सांगितली तब्येतीची अपडेट, म्हणाले 'दुष्परिणाम त्यांच्या ऑर्गन्सवर होऊ शकतो, सरकारने...'
उपोषणावरती सोनम वांगचुक अद्यापही ठाम; डॉक्टरांनी सांगितली तब्येतीची अपडेट, म्हणाले 'दुष्परिणाम त्यांच्या ऑर्गन्सवर होऊ शकतो, सरकारने...'
Sameer Choughule Angry On Student Protest: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम समीर चौघुलेंची विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर खरमरीत पोस्ट, नको-नको ते बरळणाऱ्यांनाही खडसावलं, म्हणाले...
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम समीर चौघुलेंची विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर खरमरीत पोस्ट, नको-नको ते बरळणाऱ्यांनाही खडसावलं, म्हणाले...
Nashik Rain: नाशिकमध्ये जोर'धार', दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी; गंगापूर धरणातून विसर्ग वाढवला, त्र्यंबकेश्वरला पत्रे उडून तीन भाविक जखमी
नाशिकमध्ये जोर'धार', दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी; गंगापूर धरणातून विसर्ग वाढवला, त्र्यंबकेश्वरला पत्रे उडून तीन भाविक जखमी
Pune Leopard Attack : गोठ्यात झोपलेली; पहाटे तीनच्या सुमाराच्या तो आला अन्...; चिमुरडी किंचाळल्यानंतर आई-वडिलांनी पाहिलं, तोपर्यंत तिला बिबट्यानं जबड्यात धरून उसात धूम ठोकली
गोठ्यात झोपलेली; पहाटे तीनच्या सुमाराच्या तो आला अन्...; चिमुरडी किंचाळल्यानंतर आई-वडिलांनी पाहिलं, तोपर्यंत तिला बिबट्यानं जबड्यात धरून उसात धूम ठोकली

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk Health Update: उपोषणावरती सोनम वांगचुक अद्यापही ठाम; डॉक्टरांनी सांगितली तब्येतीची अपडेट, म्हणाले 'दुष्परिणाम त्यांच्या ऑर्गन्सवर होऊ शकतो, सरकारने...'
उपोषणावरती सोनम वांगचुक अद्यापही ठाम; डॉक्टरांनी सांगितली तब्येतीची अपडेट, म्हणाले 'दुष्परिणाम त्यांच्या ऑर्गन्सवर होऊ शकतो, सरकारने...'
Sameer Choughule Angry On Student Protest: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम समीर चौघुलेंची विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर खरमरीत पोस्ट, नको-नको ते बरळणाऱ्यांनाही खडसावलं, म्हणाले...
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम समीर चौघुलेंची विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर खरमरीत पोस्ट, नको-नको ते बरळणाऱ्यांनाही खडसावलं, म्हणाले...
Nashik Rain: नाशिकमध्ये जोर'धार', दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी; गंगापूर धरणातून विसर्ग वाढवला, त्र्यंबकेश्वरला पत्रे उडून तीन भाविक जखमी
नाशिकमध्ये जोर'धार', दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी; गंगापूर धरणातून विसर्ग वाढवला, त्र्यंबकेश्वरला पत्रे उडून तीन भाविक जखमी
Pune Leopard Attack : गोठ्यात झोपलेली; पहाटे तीनच्या सुमाराच्या तो आला अन्...; चिमुरडी किंचाळल्यानंतर आई-वडिलांनी पाहिलं, तोपर्यंत तिला बिबट्यानं जबड्यात धरून उसात धूम ठोकली
गोठ्यात झोपलेली; पहाटे तीनच्या सुमाराच्या तो आला अन्...; चिमुरडी किंचाळल्यानंतर आई-वडिलांनी पाहिलं, तोपर्यंत तिला बिबट्यानं जबड्यात धरून उसात धूम ठोकली
Narendra Modi on CJP Protest Delhi Jantar Mantar: काँकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, NEET पेपरफुटी प्रकरणावर महत्वाचे आदेश
काँकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, NEET पेपरफुटी प्रकरणावर महत्वाचे आदेश
Divija Fadnavis on CJP Protest Delhi Jantar Mantar: काँकरोच जनता पार्टीच्या जंतर मंतरवरील आंदोलनावर दिविजा फडणवीस यांनी रोखठोक मत मांडलं; काय काय म्हणाल्या?
काँकरोच जनता पार्टीच्या जंतर मंतरवरील आंदोलनावर दिविजा फडणवीस यांनी रोखठोक मत मांडलं; काय काय म्हणाल्या?
VBA Maharashtra Bandh: वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला शरदचंद्र पवारांच्या पक्षाचा पाठिंबा; तर वंचितच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटीस, कायदेशीर कारवाईचा इशारा
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला शरदचंद्र पवारांच्या पक्षाचा पाठिंबा; तर वंचितच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटीस, कायदेशीर कारवाईचा इशारा
Sunetra Pawar : अपघातग्रस्त तरुणीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची तात्काळ मदत; संवेदनशीलतेतून अजितदादांच्या कार्यशैलीची आठवण
अपघातग्रस्त तरुणीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची तात्काळ मदत; संवेदनशीलतेतून अजितदादांच्या कार्यशैलीची आठवण
Embed widget