एक्स्प्लोर
वादळामुळे झाड कारवर कोसळलं, गाडीचा चक्काचूर
तबिल्सी (जॉर्जिया) : काळ आला होता पण वेळ आली नव्हती या म्हणीचा पुरेपुर प्रत्यय जॉर्जियात आला. राजधानी तबिल्सीमध्ये चालक त्याची कार पार्क करुन बाहेर पडत असताना भलं मोठं झाड कारवर कोसळलं. या घटनेत कालचालक सुदैवाने बचावला, पण कारचा मात्र चक्काचूर झाला.
ही घटना शनिवारी घडली. या थरारक घटनेचा व्हिडीओ तिथे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
जॉर्जियामध्ये मागील काही दिवसांपासून वादळी वारे वाहत आहेत. यामुळे शहरातील अनेक मोठमोठी वृक्ष उन्मळून पडत आहेत. तर वादपामुळे घरं आणि कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
यामुळे जीवितहानी झाली नसली तरी बचावदलाच्या जवांना हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.
पाहा व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement