'पुतिन युक्रेनवर अण्वस्त्रांचा वापर करू शकतात', झेलेन्स्की यांनी सर्व देशांना तयार राहण्याचा दिला इशारा
Russia-Ukraine War: रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या 53 दिवसांपासून युद्ध सुरू आहे. दरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन युक्रेनविरुद्ध अण्वस्त्रांचा वापर करू शकतात.
Russia-Ukraine War: रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या 53 दिवसांपासून युद्ध सुरू आहे. दरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन युक्रेनविरुद्ध अण्वस्त्रांचा वापर करू शकतात, या शक्यतेसाठी जगातील सर्व देशांनी तयार राहावे, असा इशारा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी दिला आहे. एका मुलाखतीदरम्यान झेलेन्स्की म्हणाले की, "फक्त मलाच नाही, तर संपूर्ण जगाने, सर्व देशांना काळजी करावी लागेल, कारण ही माहिती कदाचित खरी नसेल, मात्र असं होऊ शकतं."
झेलेन्स्की म्हणाले, "पुतिन अण्वस्त्र किंवा रासायनिक शस्त्रे वापरू शकतात, कारण त्यांच्यासाठी युक्रेनच्या लोकांचे जीव महत्वाचे नाही. त्यामुळे आपण विचार केला पाहिजे, घाबरू नका, परंतु तयार राहा. कारण हा प्रश्न केवळ युक्रेनचा नाही. तर हा प्रश्न संपूर्ण जगाचा आहे, असं मला वाटतं.''
अमेरिकन अधिकाऱ्यांनी दिला इशारा
या युद्धात पुतिन कमकुवत झाले तर ते युक्रेनमध्ये अण्वस्त्रांचा वापर करू शकतात, असा इशारा अमेरिकन अधिकाऱ्यांनी दिला आहे. अमेरिकन गुप्तचर संस्था सीआयएचे संचालक बिल बर्न्स यांनी म्हटले आहे की, रशियाचे अध्यक्ष पुतिन आणि रशियन नेतृत्वाची संभाव्य निराशा पाहता ते युद्ध संपवण्यासाठी अण्वस्त्रांचा वापर करू शकतात, असं ते म्हणाले आहेत.
दरम्यान, युक्रेनियन बाजूने रशियन सैन्याच्या नुकसानीची तुलना करताना, झेलेन्स्की यांनी दावा केला की, युक्रेनियन अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार, युद्धात अंदाजे 2,500 ते 3,000 युक्रेनियन सैनिक मारले गेले. तर या युद्धात रशियाचे 19,000 ते 20,000 लोकांचा मृत्यू झाला आहे. युद्धात सुमारे 10,000 युक्रेनियन सैनिक जखमी झाले असून त्यापैकी किती जण जिवंत आहेत हे सांगणे कठीण असल्याचे त्यांनी सांगितले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Delhi Violence : दिल्लीतील दगडफेकीनंतर राजकारण; केजरीवालांचं सुरक्षेवरून केंद्राकडे बोट, भाजपचा मुख्यमंत्र्यांवर आरोप
- Jammu Kashmir Encounter : अनंतनागमध्ये जवान-दहशतवाद्यांमध्ये चकमक, लष्कराचा जवान शहीद, ऑपरेशन सुरूच
- Russia Ukraine War : कीव्हमध्ये 900 हून अधिक मृतदेहांचा खच, रशियन सैन्य माघारी परतल्यानंतरच वास्तव
- Russia-Ukraine War : रशियन सैन्याकडून लिसिचान्स्क शहरातील तेल शुद्धीकरण केंद्रावर बॉम्बहल्ला, 24 तासांत 8 शहरांवर हल्ले