Russia Ukraine War : रशिया-युक्रेन युद्ध संपवण्याबाबत कोणताही करार नाही, लवकरच चर्चेच्या तिसऱ्या फेरीची शक्यता
Russia Ukraine War : रशिया-युक्रेनदरम्यान युद्ध संपवण्याबाबत अद्याप कोणताही करार झालेला नाही. लवकरच या दोन्ही देशांमध्ये चर्चेच्या तिसऱ्या फेरी होण्याची शक्यता आहे.
Russia Ukraine War : युक्रेन आणि रशिया युद्धावरील चर्चेची तिसरी फेरी लवकरच होण्याची शक्यता आहे. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे सल्लागार व्लादिमीर मेडिन्स्की यांनी गुरुवारी पोलंडच्या सीमेजवळ बेलारूसमध्ये रशियन शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. त्यांनी सांगितले की दोन्ही देशांची स्थिती अतिशय स्पष्ट आहे, ज्यामध्ये राजकीय निराकरणाशी संबंधित मुद्द्यांचा समावेश आहे.
त्यांनी पुष्टी केली की रशिया आणि युक्रेनने नागरिकांच्या स्थलांतरासाठी सुरक्षित कॉरिडॉर तयार करण्यासाठी तात्पुरता करार केला आहे. त्यांनी स्पष्टीकरण न देता सांगितले की, त्यांच्या बाजूने परस्पर करार झाला आहे. वरिष्ठ रशियन संसदपटू लिओनिड स्लुत्स्की म्हणाले की, चर्चेच्या पुढील फेरीत असे करार होऊ शकतात ज्यांना रशिया आणि युक्रेनच्या संसदेने मान्यता दिली पाहिजे.
एएनआय या वृत्तसंस्थेने कीव्ह इंडिपेंडंटचा हवाला देत ट्विट केले आहे, 'युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचे सल्लागार मायखाइलो पोडोलिक यांच्या मते, रशियासोबतच्या दुसऱ्या फेरीच्या चर्चेच्या निकालावर युक्रेन असमाधानी आहे. दोन्ही देश लवकरच तिसऱ्या फेरीसाठी भेटतील.'
युक्रेनमधील खारकिव्हमध्ये अडकलेल्या भारतीय भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर पडण्यासाठी रशियाने सहा तास युद्ध थांबवल्याची बातमी देशातील प्रमुख वाहिन्या आणि वृत्तपत्रात झळकली होती. आता यावर परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्टीकरण दिलं आहे. यासंबंधी प्रसारित झालेल्या बातम्या चुकीच्या असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Russia Ukraine War: युक्रेननं भारतीय विद्यार्थ्यांना ओलीस ठेवलं, रशियाचा आरोप; मदतीसाठी सरसावणार!
- Ukraine Russia War: युक्रेनची रशियन सैनिकांच्या मातांना साद, मुलांना कीव्हमधून घेऊन जाण्याची विनंती
- Russia-Ukraine War : रशिया युक्रेनशी चर्चेसाठी तयार, दोन्ही देशांमध्ये होणार दुसरी बैठक?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha