Russia Ukraine War: युक्रेननं भारतीय विद्यार्थ्यांना ओलीस ठेवलं, रशियाचा आरोप; मदतीसाठी सरसावणार!
Russia Ukraine War : युक्रेनने भारतीय विद्यार्थ्यांना ओलीस ठेवले असून मानवी ढाल म्हणून वापर केला जात असल्याचा आरोप रशियाने केला आहे.
Russia Ukraine War : युक्रेनने भारतीय विद्यार्थ्यांना ओलीस ठेवले असल्याचा आरोप रशियाने केला आहे. खारकीव्हमधून या विद्यार्थ्यांना शहरातून बाहेर पडू देत नसल्याचे भारतातील रशियन दूतावासाने म्हटले. या विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी रशियन सैन्य मदत करणार असल्याचे रशियन दूतवासाने म्हटले आहे. मागील सात दिवसांपासून रशिया-युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे.
भारतातील रशियन दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी रशियन संरक्षण मंत्रालयाने दिलेली माहिती माध्यमांनी दिली. या माहितीनुसार, युक्रेनमधील खारकीव्ह येथील भारतीय विद्यार्थ्यांना बेलगोरोद येथे जायचे आहे. मात्र, युक्रेनकडून या विद्यार्थ्यांना अटकाव करण्यात आला असून ओलीस ठेवले आहे. युक्रेनच्या सुरक्षा जवानांकडून या विद्यार्थ्यांचा वापर मानवी ढाल म्हणून केला जात असल्याचा आरोप रशियाने केला आहे. या विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीत रशियात जाण्यापासून अडवले जात आहे. या प्रकारासाठी युक्रेनचे अधिकारी जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले.
मोदी यांची पुतीन यांच्याशी चर्चा
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुखरूप सुटकेच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. पंतप्रधान कार्यालयाने ही माहिती दिली आहे. पंतप्रधान कार्यालयाने म्हटले की, दोन्ही नेत्यांनी युक्रेनच्या स्थितीचा आढावा घेतला आहे. युद्धग्रस्त भागातून भारतीयांची सुरक्षित सुटका करण्याबाबत चर्चा करण्यात आली. मागील सहा दिवसात दोन्ही नेत्यांमध्ये दुसऱ्यांदा चर्चा झाली आहे. खारकीव्हमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षेच्या मुद्यावरून देशात चितेंचे वातावरण आहे.
आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू
इतर महत्त्वाच्या बातम्या: