Ukraine Russia War: युक्रेनची रशियन सैनिकांच्या मातांना साद, मुलांना कीव्हमधून घेऊन जाण्याची विनंती
Ukraine Russia War : युक्रेनने रशियन सैनिकांच्या मातांना साद घातली आहे. आपल्या मुलांना (सैनिकांना) कीव्हमधून परत घेऊन जाण्याची विनंती केली आहे.
Ukraine Russia War : युक्रेनने रशियन सैनिकांच्या मातांना साद घातली आहे. आपल्या मुलांना (सैनिकांना) कीव्हमधून परत घेऊन जाण्याची विनंती केली आहे. युक्रेन आणि रशियामध्ये आज सातव्या दिवशी युद्ध सुरूच आहे. युद्धभूमीवर कैद झालेल्या रशियन सैनिकांना त्यांच्या मातांनी परत घेऊन जावे, अशी साद युक्रेनने रशियाला घातली आहे.
एएफपी वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे. युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, " युक्रेनमध्ये अनेक रशियन सैनिकांना कैद करण्यात आले आहे. या सैनिकांना रशियामध्ये परत नेण्यासाठी त्यांच्या माता युक्रेनची राजधानी कीव्हला आल्या तर त्यांच्याकडे या सैनिकांना सोपवण्यात येईल.
दरम्यान, युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाने इन्फोग्राफिक ट्विटद्वारे 2 मार्चपर्यंतची रशियन सैनिकांच्या मृतांची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार युक्रेनमध्ये सुमारे 5840 रशियन सैनिक मारले गेले आहेत. याबरोबरच रशियाची 30 विमानेही युक्रेनने नष्ट केली आहेत. युक्रेनने रशियाला आक्रमक असे संबोधले असून युद्धात रशियाने 31 हेलिकॉप्टर गमावल्याचे म्हटले आहे. रशियाने 211 रणगाडेही गमावले आहेत. याशिवाय रशियाला 60 ट्रॅक, 3 यूएव्ही ड्रोन, 1 विमानविरोधी क्षेपणास्त्र प्रणालीचाही फटका बसला आहे.
युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, रशियाचे 862 सशस्त्र वाहनांचे नुकसान झाले आहे. याशिवाय 85 शस्त्रे, 40 ग्रेड सिस्टीम, 355 इतर वाहनेही युद्धात नष्ट करण्यात आली आहेत. याशिवाय रशियाने 2 युद्धनौकाही गमावल्याचा दावा युक्रेनने केला आहे. यासोबतच युक्रेनमध्ये 9 विमानविरोधी युद्ध प्रणालीही नष्ट करण्यात आली असल्याचा दावा करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- Russia Ukraine Conflict : खारकिव्ह शहर तातडीनं सोडा, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे भारतीय नागरिकांना आदेश
- Russia Ukraine War : मिसाईल हल्ल्यानंतर युक्रेनमधील खारकिव्ह बेचिराख, मन हेलवणारी दृश्य
- Russia-Ukraine War : रशिया युक्रेनशी चर्चेसाठी तयार, दोन्ही देशांमध्ये होणार दुसरी बैठक?
- Crude Price Rise: कच्च्या तेलाच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी अमेरिका देणार तीन कोटी बॅरल कच्चे तेल, राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची घोषणा