एक्स्प्लोर
भारतासह जगभरात नववर्षाच्या स्वागताचा उत्साह
मुंबई : 2016 ला गुडबाय करण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत. जसजसे घडाळ्याचे काटे पुढे सरकतील, तसा नवीन वर्षाच्या स्वागताचा जल्लोष आणि उत्साह वाढतोय. न्यूझीलंडमध्ये 2017 चं आगमन झालं आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी ऑकलंडमध्ये नयनरम्य रोषणाई करण्यात आली. आतषबाजीच्या झगमगाटात ऑकलंडचा स्काय टॉवर उजळून निघाला होता.
न्यूझीलंडनंतर ऑस्ट्रेलियामध्ये नववर्षाचं उत्साहात स्वागत झालं. सुप्रसिद्ध सिडनी हार्बर ब्रिजवर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. हा नयनरम्य सोहळा बघण्यासाठी जगभरातील पर्यटकांनी सिडनीत धाव घेतली आहे.
जपानमधील टोकीयो शहरात आकाशात फुगे सोडून नववर्षाचं स्वागत करण्यात आलं. तर हाँगकाँगमध्ये देखील मोठ्या जल्लोषात नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलं.
व्हिएतनाममध्ये देखील नववर्षाच्या आगमनासाठी रोशणाई आणि आतषबाजीचा उत्सव पाहायला मिळाला.
भारतात नववर्षाचं आगमन एक सेकंद उशीरा
भारतात नोटाबंदीनंतर निर्माण झालेला चल्लनकल्लोळ विसरून थर्टी फर्स्टचं सेलिब्रेशन करण्यात येणार आहे. न्यू इयरच्या सेलिब्रेशनवर नोटाबंदीचं सावट पडू नये म्हणून आयोजकांनी कॅशलेस व्यवहारांची पूर्ण तयारी केली आहे.
दरवर्षी 12 वाजता नववर्ष प्रवेश होतो. मात्र यंदा एक सेकंद उशीरा म्हणजे बारा वाजून एक सेकंदानंतर नवीन वर्षाची सुरूवात होणार आहे. पृथ्वीचं भ्रमण दररोज 2 मिली सेकंदांनी उशिरा होतं. ती वेळ भरून काढण्यासाठी ही तजवीज करण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement