सोन्याच्या खाणींवर वसलेलं शहर, अंतराळाच्या सर्वात जवळ; वाचा सविस्तर
City On Gold : ला रिंकोनाडा हे जगातील सर्वात उंचीवर वसलेलं शहर मानलं जातं. हे शहर सोन्याच्या ढिगाऱ्यावर वसलेलं आहे.
![सोन्याच्या खाणींवर वसलेलं शहर, अंतराळाच्या सर्वात जवळ; वाचा सविस्तर La Rinconada Peruvian City of gold mine this city situated in gold mines is closest to space marathi news सोन्याच्या खाणींवर वसलेलं शहर, अंतराळाच्या सर्वात जवळ; वाचा सविस्तर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/27/4ad21431190d2540d7068b38b67b15361716824798683322_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : आज आम्ही तुम्हाला जगातील एका अशा शहराविषयी सांगणार आहोत जे सोन्याच्या ढिगाऱ्यावर (City On Gold) आहे. हा मोठा सोन्याचा ढिगारा अनेक देशांची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी पुरेसे आहे. या सोन्यामुळे लाखो लोक करोडपती होऊ शकतात. पण इथले लोक नशिबाने तेवढे श्रीमंत नाहीत. हे शहर इतक्या उंचीवर वसलेले आहे की, ते अंतराळाच्या सर्वात जवळ (City Closest To Space) असल्याचं मानलं जातं. पण इथे राहणं सगळ्यांनाच शक्य नाही, कारण इथे ऑक्सिजन तुलनेत खूपच कमी आहे. बाहेरून कोणी, जर या ठिकाणी गेलं तर त्याला श्वास घ्यायला त्रास होतो. मात्र, येथे राहणाऱ्या लोकांना कमी ऑक्सिजनमध्ये राहण्याची सवय झाली आहे.
सोन्याच्या खाणींवर वसलेलं शहर
दक्षिण अमेरिकन देश पेरूमध्ये वसलेले शहर ला रिंकोनाडा हे जगातील सर्वात उंचीवर वसलेलं शहर मानलं जातं, याची उंची 5500 मीटरपेक्षा जास्त आहे. रिंकोनाडाला अंतराळाच्या सर्वात जवळचे शहर म्हणून म्हटलं जातं. उंचीमुळे येथील वातावरण ग्रीनलँडसारखे थंड आहे आणि सरासरी तापमान उणे डिग्री सेल्सिअसमध्ये जाते. या शहराची लोकसंख्या अंदाजे 60,000 आहे. येथे लोक वेगाने येऊन स्थायिक होत आहेत. इथे सोन्याची खाण आहे, त्याच्या लोभापोटी लोक येथे स्थायिक होत आहेत. येथील लोक कशाप्रकारे जीवन जगतात जाणून घ्या.
अंतराळाच्या सर्वात जवळील शहर
ला रिंकोनाडा ही जगातील सर्वात उंचीवरील शहर आहे. ही जगातील सर्वात उंच ठिकाणी असलेली मानव वस्ती आहे. ला रिंकोनाडा हे पेरूच्या अँडीज पर्वतरांगांमधील एक शांत ग्रामीण गाव होते. पण 1990 च्या दशकात येथे सोन्याचा शोध लागला आणि ला रिंकोनाडाकडे पाहण्याचा दृष्टीकोनही बदलला. आता हे एक गजबजलेलं ठिकाण आहे. इथे संपूर्ण दक्षिण अमेरिकेतील हजारो गरीब लोक श्रींमत होण्यासाठी संधीच्या शोधात येतात. आता हे शहर सुमारे 50,000 रहिवाशांचे एक बेकायदेशीर आणि गर्दीचे शहर आहे. महत्त्वाचं म्हणजे या देशामध्ये अनेक मूलभूत सेवांचाही अभाव आहे. येथे फूटपाथ, रस्ते, गटारे किंवा वाहणाऱ्या पाण्याचा स्त्रोतही नाही. येथील बहुतेक लोक दारू, ड्रग्जच्या आहारी असून गुन्हेगारीच्या मार्गावर गेले आहेत.
फक्त 50 टक्के ऑक्सिजन
ला रिंकोनाडा शहरातील सोन्याच्या खाणी अनानिया कॉर्पोरेशनच्या मालकीच्या आहेत. येथील बहुतेक रहिवासी खाण कामगार आहेत. येथील कामगार 30 दिवस पगाराशिवाय काम करतात आणि 31 व्या दिवशी त्यांना खाणीतून जास्तीत जास्त खनिज घेण्याची परवानगी आहे. या दिवशी खाणकामातून जे धातू मिळतात, तोच कामगारांचा महिन्याभराचा मोबदला. बऱ्याच खाण कामगारांकडे कोणतीही खनिजे आणि धातू विकण्यासाठी उत्तम मार्ग नसतात, म्हणून त्यांची मेहनत कवडीमोल भावात विकली जाते. या शहरात ना कोणी, कर घेतो, ना कोणी प्रशासन आहे. त्यामुळे येथे कोणत्याही प्रकारची सुविधा नाही. रस्ते आणि ड्रेनेजची व्यवस्था नाही. या शहरात ऑक्सिजनची पातळी खूपच कमी आहे. येथे फक्त 50 टक्के ऑक्सिजन उपलब्ध आहे. इथल्या लोकांना त्याची सवय झाली आहे, पण बाहेरून कोणी आले तर येथे जगणे सोपे जाणार नाही.
सोन्याच्या खाणींवर वसलेलं शहर
अँडीज पर्वतांमध्ये वसलेल्या ला रिंकोनाडा शहराच्या खाली अनेक सोन्याच्या खाणी आहेत. कायदेशीररित्या येथे खाणकाम करण्यास परवानगी नाही, तरीही अनेक कंपन्या येथे अवैधरित्या सोन्याचं उत्खनन करतात. या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांवर येथील अर्थव्यवस्था अवलंबून आहे. पुरुष सोन्याच्या खाणीत काम करतात आणि स्त्रिया विखुरलेल्या खडकांच्या तुकड्यांमध्ये सोन्याचं कण शोधतात.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)