Washim Crime : लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्नातून 35 वर्षीय महिलेची हत्या, वाशिममधील धक्कादायक प्रकार
Washim Crime : लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्नातून 35 वर्षीय महिलेची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.
Washim Crime : महिलेला एकटी पाहून लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्नात 35 वर्षीय महिलेची हत्या करण्यात आल्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी समोर आला होता. ही घटना वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात घडली होती. दरम्यान, आज (दि.5) दोन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
महिला बकऱ्या चारण्याकरीता गेली असताना अत्याचार
अधिकची माहिती अशी की, वाशिमच्या कारंजा तालुक्यातील खेर्डा जिरापुरे शेत शिवारात 35 वर्षीय महिला बकऱ्या चारण्याकरीता जंगलात गेली होती. दरम्यान, अज्ञात व्यक्तीने धार शस्त्राने मानेवर वार करून हत्या केल्याची घटना दोन दिवसा पूर्वी घडली होती...याप्रकरणी कारंजा पोलिसांनी तपासचक्र फिरवत गावातील रहीवासी संदिप गायकवाड हा व्यक्ती घटना घडल्यापासून बेपत्ता असल्याचं लक्षात येताच पोलिसांनी या आरोपीचा शोध सुरू केला.
आरोपीचा मुंबईकडे फरार होण्याचा प्रयत्न
मुंबईला जाऊन फरार होण्याच्या मार्गावर असताना संदीप गायकवाड बुलढाणाच्या नांदुरा रेल्वे स्टेशनच्या बाहेर पोलिसांनी संदीपला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता .. महिलेवर लैंगिक अत्याचार करण्याच्या (अतिप्रसंग)प्रयत्नातून हत्या केल्याचं कबूल केलं ...या प्रकरणी गावातील किशोर ऊर्फ बाबू देवराव कोवे यांनी सहकार्य केले असल्याची कबुली देताच संदीप गायकवाड आणि किशोर कोवे यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
परभणीत दरोडा टाकून महिलेवर सामूहिक अत्याचार केलेल्या घटनेतील आरोपींना तत्काळ अटक करा : डॉ.नीलम गोर्हे
परभणी : परभणी येथे दिनांक ३ जानेवारी च्या पहाटे चोरट्यांनी सशस्त्र दरोडा टाकला. तेथे वास्तव्यास असलेल्या कुटुंबातील एका शेतमजूर महिलेवर सामूहिक अत्याचार केला. यावेळी धारदार शस्त्राने हल्ला केल्याने कुटुंबातील तीन सदस्य जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे. याची विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोर्हे यांनी गंभीर दखल घेतली आहे. यात त्यांनी आज पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला व याघटनेत आरोपींना कठोर शिक्षा केली जाईल याबाबत सूचना केल्या. यात परभणीत अशाच प्रकारे गुन्हा घडल्याचे व यातील कार्यपद्धती एकाच असल्याचे देखील डॉ.गोर्हे यांनी परदेशी यांच्या निदर्शनास आणून दिल्या.
इतर महत्त्वाच्या बातम्या