एक्स्प्लोर

Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुखांची हत्या करुन गुजरातला पळाले; पैसे संपताच सुदर्शन घुले अन् सुधीर सांगळेने मुंबई-पुणे गाठले!

Santosh Deshmukh Murder Case: सरपंच संतोष देशमुख यांचे 9 डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली. यानंतर प्रकरणातील आरोपी फरार झाले.

Santosh Deshmukh Murder Case बीड: बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) अटक करण्यात आलेल्या सुदर्शन घुले  (Sudharshan Ghule) आणि सुधीर सांगळे (Sudhir Sangle) यांच्याकडून नवी माहिती उघड झाली आहे. देशमुख यांची हत्या केल्यानंतर सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे हे गुजरातला गेले होते. 

सरपंच संतोष देशमुख यांचे 9 डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली. यानंतर प्रकरणातील आरोपी फरार झाले. यात प्रमुख सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांनी थेट गुजरात गाठले.. गुजरात मध्ये पैसे संपल्यानंतर त्यांनी मुंबई गाठली नंतर पुण्यात आले. शुक्रवारी रात्री सुदर्शन घुले याच्याशी संबंधित डॉक्टर संभाजी वायभसेला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता घुलेने एका मित्राला फोन केला. या कॉल लोकेशन वरून त्याला पोलिसांनी घेण्यात अटक केली. गुजरात मध्ये या दोघांनी नेमका आश्रय कुठे घेतला? याचा तपास देखील केला जात आहे.

सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे ताब्यात-

संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. खंडणी प्रकरणी वाल्मिक कराडने (Walmik Karad) 31 डिसेंबर रोजी सीआयडीला सरेंडर केलं होतं. त्यानंतर अनेक दिवासांपासून फरार असलेले सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला शुक्रवारी (03 जानेवारी) ताब्यात घेण्यात आले. 

आरोपींना 14 दिवसांची सीआयडी कोठडी-

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवणे या तीनही आरोपींना 14 दिवसांची सीआयडी कोठडी देण्यात आली आहे. केज न्यायालयाचे प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी एस व्ही पावसकर यांनी ही शिक्षा सुनावली आहे.  या तीनही आरोपींना 25 दिवसांनंतर अटक करण्यात आली आहे. फरार असलेला मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह सुधीर सांगळेच्या मुसक्या एसआयटीच्या पथकाने बालेवाडीत आवळल्या. अद्याप या प्रकरणातील आणखी एक आरोपी कृष्णा आंधळे मात्र फरार आहे. 

ऊसतोड मुकादम म्हणून काम करायचा, कोण आहे सुदर्शन घुले?

सुदर्शन घुले बीडमधील केजचा टाकळी गावचा रहिवाशी आहे. सुदर्शन घुले 27 वर्षांचा आहे. सुदर्शनचं इयत्ता सातवीपर्यंत शिक्षण झाले आहे. सध्या सुदर्शन हा ऊसतोड मुकादम म्हणून काम करायचा. तसेच उचल घेऊन कामाला न आलेल्या मजूरांकडून सुदर्शन वसुली देखील करायचा. सुदर्शनची राजकारणात देखील चांगली ओळख असल्याचं सांगण्यात येत आहे. सुदर्शनवर 10 वर्षांत 10 गुन्हे दाखल आहेत. तर कृष्णा आंधळेवर 4 वर्षांमध्ये 6 गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर  आली आहे. याचदरम्यान वाल्मिक कराड याचा खास असलेल्या विष्णू चाटे याच्यासोबत त्याची ओळख झाली. त्यातून त्याला काही कामं मिळाली. राजकीय नेते, पक्षाचे काम करणे, व्यवहार सांभाळणे अशा कामात तो तरबेज असल्याचे गावकरी सांगतात.

मुसक्या आवळल्या, न्याय मिळणार?, VIDEO:

संबंधित बातमी:

वाल्मिक कराड सरेंडर, पण सुदर्शन घुले त्यापेक्षा डेंजर; सरपंच हत्येतील मुख्य आरोपी घुले कोण?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anjali Damania : एसआयटी, सीआयडी चौकशी धूळफेक; वाल्मिक कराडला नमस्कार करणारी लोकं काय खाक चौकशी करतील? अंजली दमानियांचा हल्लाबोल
एसआयटी, सीआयडी चौकशी धूळफेक; वाल्मिक कराडला नमस्कार करणारी लोकं काय खाक चौकशी करतील? अंजली दमानियांचा हल्लाबोल
Gautam Gambhir : प्रशिक्षक होताच हाती काही लागेना, त्यात प्रश्न आला थेट विराट आणि रोहितच्या निवृत्तीचा! मास्तर गंभीर म्हणाले, 'मी कोणाचा...'
प्रशिक्षक होताच हाती काही लागेना, त्यात प्रश्न आला थेट विराट आणि रोहितच्या निवृत्तीचा! मास्तर गंभीर म्हणाले, 'मी कोणाचा...'
Manikrao Kokate on Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीने भुजबळांचे खूप लाड केले, त्यांना जिथं जायचं तिथं जाऊ शकतात; माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं!
राष्ट्रवादीने भुजबळांचे खूप लाड केले, त्यांना जिथं जायचं तिथं जाऊ शकतात; माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं!
Jasprit Bumrah Player of the Series : फाईट फक्त बुमराह विरुद्ध ऑस्ट्रेलियाचीच झाली, बाकीच्यांची मस्तपैकी सहल झाली! मालिकावीर झालेला कॅप्टन बुमराह म्हणाला तरी काय?
फाईट फक्त बुमराह विरुद्ध ऑस्ट्रेलियाचीच झाली, बाकीच्यांची मस्तपैकी सहल झाली! मालिकावीर झालेला कॅप्टन बुमराह म्हणाला तरी काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Laxman Hake On Manoj Jarange : जरांगे घुसायची भाषा आम्हाला सांगू नको, नाही तर..Manoj Jarange News : तुमचा खून झाल्यावर आम्ही मोर्चा काढणार नाही का? धनंजय मुंडेंना घडवून आणायचंय?Manoj Jarange Pune : जर धनंजय मुंडेचं पोट भरलं नसेल तर..आता आमचा नाईलाज आहे..-जरांगेAjit Pawar Bowling Baramati : क्रिकेटच्या मैदानात दादांची कमाल! दादांची बॉलिंग पाहून सगळे थक्क

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anjali Damania : एसआयटी, सीआयडी चौकशी धूळफेक; वाल्मिक कराडला नमस्कार करणारी लोकं काय खाक चौकशी करतील? अंजली दमानियांचा हल्लाबोल
एसआयटी, सीआयडी चौकशी धूळफेक; वाल्मिक कराडला नमस्कार करणारी लोकं काय खाक चौकशी करतील? अंजली दमानियांचा हल्लाबोल
Gautam Gambhir : प्रशिक्षक होताच हाती काही लागेना, त्यात प्रश्न आला थेट विराट आणि रोहितच्या निवृत्तीचा! मास्तर गंभीर म्हणाले, 'मी कोणाचा...'
प्रशिक्षक होताच हाती काही लागेना, त्यात प्रश्न आला थेट विराट आणि रोहितच्या निवृत्तीचा! मास्तर गंभीर म्हणाले, 'मी कोणाचा...'
Manikrao Kokate on Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीने भुजबळांचे खूप लाड केले, त्यांना जिथं जायचं तिथं जाऊ शकतात; माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं!
राष्ट्रवादीने भुजबळांचे खूप लाड केले, त्यांना जिथं जायचं तिथं जाऊ शकतात; माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं!
Jasprit Bumrah Player of the Series : फाईट फक्त बुमराह विरुद्ध ऑस्ट्रेलियाचीच झाली, बाकीच्यांची मस्तपैकी सहल झाली! मालिकावीर झालेला कॅप्टन बुमराह म्हणाला तरी काय?
फाईट फक्त बुमराह विरुद्ध ऑस्ट्रेलियाचीच झाली, बाकीच्यांची मस्तपैकी सहल झाली! मालिकावीर झालेला कॅप्टन बुमराह म्हणाला तरी काय?
Nashik Crime News : नाशकात गुंडांचा हैदोस, टवाळखोरांनी दगडफेक करत CCTV फोडले, पोलिसांचा धाक संपला का?
नाशकात गुंडांचा हैदोस, टवाळखोरांनी दगडफेक करत CCTV फोडले, पोलिसांचा धाक संपला का?
Anjali Damania : बीडचे अधिकारी बीडच्या बाॅसची निष्पक्ष चौकशी करणार? या शासनाचं डोकं ठिकाणांवर आहे का? दमानियांनी वाल्मिक कराड आणि त्या पोलिस अधिकाऱ्याचा फोटोच समोर आणला!
बीडचे अधिकारी बीडच्या बाॅसची निष्पक्ष चौकशी करणार? दमानियांनी वाल्मिक कराड आणि त्या पोलिस अधिकाऱ्याचा फोटोच समोर आणला!
Santosh Deshmukh Case : मग गृह खातं झोपा काढत आहे का? तुमचा गृहखात्यावर आणि गृहमंत्र्यावर विश्वास नाही का? सुरेश धसांनी अजितदादांना घेरताच राष्ट्रवादी आक्रमक 
मग गृह खातं झोपा काढत आहे का? तुमचा गृहखात्यावर आणि गृहमंत्र्यावर विश्वास नाही का? सुरेश धसांनी अजितदादांना घेरताच राष्ट्रवादी आक्रमक 
Video : माझ्या खिशात काय... स्टीव्ह स्मिथच्या विकेटनंतर मैदानातच राडा! विराट कोहलीच्या हातवाऱ्यांमुळे नव्या वादाला तोंड फुटणार?
माझ्या खिशात काय... स्टीव्ह स्मिथच्या विकेटनंतर मैदानातच राडा! विराट कोहलीच्या हातवाऱ्यांमुळे नव्या वादाला तोंड फुटणार?
Embed widget