Gautami Patil : गौतमी पाटील आता नव्या रुपात येणार; शिंदेशाहीच्या तालावर थिरकणार नृत्यांगणा
Gautami Patil : नृत्यांगणा गौतमी पाटील आता शिंदेशाहीच्या तालावर नाचणार आहे.
Gautami Patil : महाराष्ट्रासह देशभरात सध्या नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil) हे नाव चर्चेत आहे. आपल्या लावणी आणि सौंदर्याने सर्वांना घायाळ करणारी गौतमी आता एका खास प्रोजेक्टच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'बिग बॉस'फेम (Bigg Boss) उत्कर्ष शिंदेने (Utkarsh Shinde) सोशल मीडियावर गौतमीसोबतचे फोटो शेअर केले आहेत.
शिंदेशाहीच्या तालावर नाचणार गौतमी पाटील (Utkarsh Shinde Post)
उत्कर्ष शिंदेने (Utkarsh Shinde) गौतमी पाटीलसोबतचे फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करत त्याने लिहिलं आहे,"अहो शेट लय दिसान झालीया भेट", या माझ्या संगीतबद्ध केलेल्या सुपरहिट लावणीनंतर यावर्षी लवकरच तुम्हा सर्वांसाठी माझं नवं लिखाण, नवं संगीत नव्या गायकेसोबत खूप साऱ्या नवीण लावण्या घेऊन येणार... लवकरच".
उत्कर्ष शिंदे आणि गौतमीच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना उत्सुकता आहे. उत्कर्षच्या पोस्टवर दोघांनाही खूप शुभेच्छा, देखण्या गौतमी तयार आहेत गाजवायला महाराष्ट्राचा मंच, तुझी लिखाणातील अदाकारी आणि गौतमीची नृत्यातील अदाकारी यांचा धिंगाणा बघायला भयंकर उत्सुक आहोत, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. आनंद शिंदे यांनी सुरेखा पुणेकर यांना घेऊन लावणी केली आहे. तर आदर्श शिंदेनेदेखील अनेक पारंपारिक लावण्या केल्या आहेत. आता उत्कर्ष शिंदेदेखील लावणी गाण्यासाठी सज्ज आहे. त्याच्या पहिल्या लावणीत गौतमी पाटील थिरकणार आहे.
View this post on Instagram
आपल्या नृत्यात अश्लील हावभाव करत असल्याने गौतमीवर प्रचंड टीका झाली आहे. पण तरी गौतमीने आपल्या नृत्याने सर्वांनाच वेड लावलं आहे. आता गौतमीच्या या नव्या प्रोजेक्टची चाहत्यांना चांगलीच उत्सुकता आहे.
मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करण्यासाठी गौतमी पाटील सज्ज! (Gautami Patil Movie)
गौतमीचं 'तेरा पता' हे गाणं नुकतचं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. तिच्या या गाण्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करण्यासाठी गौतमी सज्ज आहे. गौतमीचा 'घुंगरू' (Ghungroo) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या सिनेमातील 'मी करते तुम्हाला मुजरा' ही तिची लावणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. तिची ही लावणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली असून प्रेक्षक आता सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. तसेच ती एका वेबसीरिजमध्ये झळकणार असल्याचं म्हटलं जात आहे.
संबंधित बातम्या