![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Trending : मोठ्या कष्टाने मेहनत घेऊन घेतली SUV कार, आनंद महिंद्रांना केले टॅग! उत्तर आले...
Trending Anand Mahindra Reply: एका व्यक्तीने 10 वर्षांच्या मेहनतीनंतर महिंद्रा कंपनीची कार खरेदी केली. या व्यक्तीने आनंद महिंद्रा यांना टॅग केले.
![Trending : मोठ्या कष्टाने मेहनत घेऊन घेतली SUV कार, आनंद महिंद्रांना केले टॅग! उत्तर आले... Trending marathi news after buying new mahindra suv 700 man tag anand mahindra for his blessing business icon reply viral on social media Trending : मोठ्या कष्टाने मेहनत घेऊन घेतली SUV कार, आनंद महिंद्रांना केले टॅग! उत्तर आले...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/04/5790e81435fc194d248da26a0afe32b31659580493_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Trending Anand Mahindra Reply: आपल्या कष्टाच्या पैशाने विकत घेतलेल्या प्रत्येक गोष्टीचे महत्त्व एका सामान्य माणसाला समजू शकते. एका व्यक्तीने 10 वर्षांच्या मेहनतीनंतर महिंद्रा कंपनीची कार खरेदी केली. या व्यक्तीने आनंद महिंद्रा यांना टॅग करत त्याच्या नवीन महिंद्रा एसयूव्हीसोबतचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला आणि त्यांचे आशीर्वाद मागितले. महिंद्रा ग्रुपचे चेअरपर्सन आनंद महिंद्रा यांनीही यावर प्रतिक्रिया दिली, ज्यामुळे या व्यक्तीला पाहून आणखी आनंद झाला आहे. काय म्हणाले आनंद महिंद्रा?
"10 वर्षांच्या मेहनतीनंतर नवीन महिंद्रा XUV700 खरेदी केली, सर तुमच्या आशीर्वादाची गरज"
ट्विटर युझरने अशोक कुमारने अलीकडेच नवीन महिंद्रा XUV700 विकत घेतली आणि नंतर त्याच्या नवीन चमकदार पांढर्या SUV च्या शेजारी उभा असलेला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. पोस्टमध्ये बिझनेस आयकॉन आनंद महिंद्रा यांना टॅग करत अशोक कुमार यांनी लिहिले, "10 वर्षांच्या मेहनतीनंतर नवीन महिंद्रा XUV700 खरेदी केली, सर तुमच्या आशीर्वादाची गरज आहे."
Thank you, but it is YOU who have blessed us with your choice…Congratulatioms on your success that has come from hard work. Happy motoring. https://t.co/aZyuqOFIa8
— anand mahindra (@anandmahindra) August 2, 2022
काय आहे आनंद महिंद्रा यांचे उत्तर?
अशोक कुमार यांच्या ट्विटनंतर दोन दिवसांनी आनंद महिंद्रा यांनी कुमार यांचे केवळ अभिनंदनच नाही तर महिंद्र अँड महिंद्राची कार खरेदी केल्याबद्दल त्यांचे आभारही मानले. आनंद महिंद्रा यांनी कार (एसयूव्ही) खरेदी करणाऱ्या व्यक्तीला ट्विटरवर उत्तर दिले की, "कष्टाने मिळवलेल्या यशाबद्दल अभिनंदन." आनंद महिंद्राच्या उत्तराने ऑनलाइन यूजर्सची मने जिंकली आहेत.
संबंधित इतर बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)