Viral Video : दोन वेळच्या जेवणासाठी मजुराची मेहनत, डोक्यावर बाईक घेऊन चढवली बसच्या टपावर, चकित करणारा व्हायरल व्हिडीओ
Trending Video : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक मजूर डोक्यावर दुचाकी ठेऊन बसच्या टपावर चढवताना दिसत आहे.
Viral Video : सोशल मीडियावर (Social Media) दररोज वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होताना पाहायला मिळतात. नवनवीन भन्नाट आणि मजेदार व्हिडीओंमुळे नेटकऱ्यांचं मनोरंजन होतं. कधी कधी काही हदयाला हात घालणारे व्हिडीओही सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत येतात. सध्या अशाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ एका मजुराचा आहे. हा व्हिडीओ पाहणारा प्रत्येक जण हैराण झाला आहे. पोटापाण्यासाठी या मजूराची मेहनत पाहणाऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं आहे. व्हिडीओ पाहून युजर्सला अश्रू अनावर झाले आहेत. नेटकरी मजूराच्या मेहनतीचं कौतुक करत आहेत.
या व्हायरल व्हिडीओमध्ये एक मजूर डोक्यावर दुचाकी ठेऊन बसच्या टपावर चढवताना दिसत आहे. या मजूर दुचाकी बसच्या टपावर चढवत आहे. एवढं वजन एकट्याने डोक्यावर घेऊन टपावर चढवणं खरंच हैराण करणार आहे. दोन वेळेच्या जेवणासाठी या मजूराची मेहनत खरंच प्रशंसनीय आहे.
लोगों को अपना परिश्रम संघर्ष लगता है और दूसरों का तमाशा।
— उम्दा_पंक्तियां (@umda_panktiyan) July 29, 2022
~ सत्यव्रत रजक pic.twitter.com/ty8ibiuA3R
व्हायरल झाला व्हिडीओ
मजुराचा हा व्हिडीओ ट्विटरवर umda_panktiyan नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'प्रत्येकाला स्वत:चे कष्ट संघर्ष वाटतो आणि इतरांचे कष्ट तमाशा.' या व्हिडीओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. 29 जुलैला शेअर करण्यात आलेला व्हिडीओ 45 हजार युजर्सने पाहिला आहे. अनेक युजर्स मजुराच्या प्रामाणिकपणाचं आणि मेहनतीचं कौतुक करत आहेत.
संबंधित इतर बातम्या
- Anand Mahindra Tweet : आधुनिक युगातील देशी जुगाड पाहून आनंद महिंद्राच चकित, व्हिडीओ पोस्ट करत म्हणाले...
- Viral Video : रस्त्यावर आणि भिंतीवर साकारलं भन्नाट 3D आर्ट, व्हिडीओ पाहून तुम्हालाही विश्वास बसणार नाही
- Wedding After Death : मृत्यूच्या 30 वर्षांनंतरही थाटामाटात 'लग्न'! कर्नाटक-केरळच्या भागात आजही 'ही' प्रथा कायम