Viral Post : शाब्बास पोरी! गणिताच्या पेपरात कमी गुण तरीही आईला लेकीचं कौतुक; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
Viral Post : सोशल मीडियावर सध्या एका मुलीची पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. मुलीला गणिताच्या परीक्षेत कमी गुण मिळाले तरीही आईने लेकीसाठी खूप छान संदेश दिला आहे.
मुंबई : आपल्या मुलांनी चांगले गुण मिळवावेत असा अट्टाहास प्रत्येक पालकांचा असतो. तसेच मुलांना चांगले गुण मिळाल्यावर त्यांच्या प्रगतीपुस्तकावर सही पालक अगदी आनंदाने करतात. पण जर का मुलाला कमी गुण मिळाले तर मात्र मुलांना पालकांच्या रागाला सामोरं जावं लागतं. पण सध्या सोशल मीडियावरची (Social Media) एक पोस्ट मात्र सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत आहे. एका मुलीने ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये या मुलीने तिची इयत्ता सहावीमधील एका विषयाचे फोटो शेअर केले आहेत. या मुलीला गणितात कमी गुण मिळाले आहेत. तिच्या आईने त्यावर स्वाक्षरी केलीच पण काही प्रोत्साहनपर शब्द देखील लिहिले आहेत.
'Thank You आई...'
या मुलीने तिचे काही जुने परीक्षांचे पेपर शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिला गणिताच्या पेपरमध्ये 15 पैकी शून्य गुण मिळाले आहेत. पण तिच्या आईने त्यावर एक खूप छान संदेश लिहिला आहे. तिच्या आईने त्यावर लिहिलं आहे की, "असा निकाल आणायला देखील खूप धाडस लागतं." यावर या मुलीने ट्वीट करत म्हटलं आहे की, 'मला माझ्या इयत्ता सहावीमधील काही वह्या सापडल्या आहेत. यावर माझ्या आईने मला ज्या विषयांत कमी गुण मिळाले आहेत त्यावर देखील सही केली आहे. तसेच तिने त्यावर माझ्यासाठी प्रोत्साहनपर संदेश देखील लिहिला आहे."
found my grade 6 math notebook and love how precious mother was signing every bad test with an encouraging note for me! pic.twitter.com/AEJc3tUQon
— zainab (Taylor’s version) (@zaibannn) August 25, 2023
तिने तिच्या पुढच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, त्यानंतर मी गणित या विषयामध्ये खूप मेहनत घेतली आणि चांगले गुण देखील मिळवले. जेव्हा तुम्ही तुमच्या मुलाला प्रत्येक परिस्थितीमध्ये समजून घेता तेव्हा त्यामधून सकारात्मकच निकाल मिळतो.
i went on to study math and even enjoy it until a levels. i scored well too! this is what happens when you don’t shame your child for failing.
— zainab (Taylor’s version) (@zaibannn) August 25, 2023
सोशल मीडियावर पसंती
या पोस्टला सोशल मीडियावर देखील तुफान पसंती मिळाली आहे. लाखो लोकांनी ही पोस्ट लाईक केली असून अनेकांनी शेअर देखील केली आहे. तर अनेकांनी या पोस्टवर काही सकारात्मक प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. 'हे खूपच छान आहे', असं काहींनी म्हटलं आहे, तर 'तुझी आई खरचं हिरा आहे', अशा कमेंट्स काही जणांनी केल्या आहेत.
हेही वाचा :
Neeraj Chopra : भारताचा प्रसिद्ध भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकून रचला इतिहास!