(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Neeraj Chopra : भारताचा प्रसिद्ध भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकून रचला इतिहास!
Neeraj Chopra : हंगेरीच्या बुडापेस्ट शहरात सुरू असलेल्या World Athletics Championship 2023 च्या शेवटच्या दिवशी भारताला भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकले आहे.
Neeraj Chopra : जागतिक भालाफेक स्पर्धेत भारताचा प्रसिद्ध भालाफेकपटू नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याने दणदणीत कामगिरी केली आहे. नीरजने या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून नवा इतिहास रचला आहे. त्याने 88.17 मीटरपर्यंत भालाफेक केली. तर, पाकिस्तानी खेळाडू नदीम अर्शद दुसऱ्या क्रमांकावर राहिला आणि त्याला रौप्यपदक जिंकण्यात समाधान मानावे लागले.
हंगेरीच्या बुडापेस्ट शहरात सुरू असलेल्या (अॅथेलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप) World Athletics Championship 2023 च्या शेवटच्या दिवशी आज भारताला भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकले आहे. नीरजने 88.17 मीटर लांब भालाफेक करून ही सुवर्ण कामगिरी केली. 2020 साली ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेक प्रकारात सुवर्णपदक जिंकलेल्या नीरज चोप्राने आज येथे जागतिक स्पर्धेत पुन्हा सुवर्ण कामगिरी करत क्रीडा क्षेत्रात जागतिक स्तरावर भारताचा झेंडा आणखी उंच केला. यापूर्वी नीरज चोप्राने World Athletics Championship स्पर्धेत रौप्य पदक पटकावले होते.
नीरज चोप्राने दुसऱ्या फेरीत शानदार पुनरागमन केले
नीरज चोप्रा दुसऱ्या फेरीनंतर 88.17 मीटरसह अव्वल ठरला. त्याचवेळी जर्मनीचा ज्युलियन वेबर दुसऱ्या फेरीत 85.79 मीटर फेक करून दुसरा आला. या फेरीनंतर झेक प्रजासत्ताकचा जेकोब वडलेच 84.18 मीटर गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिला.
Arshad Nadeem and Neeraj Chopra congratulating each other. Only 0.35m separated both of them tonight. Two supreme athletes and they will meet again in Paris Olympics 🇵🇰🇮🇳❤️❤️ #WorldAthleticsChamps pic.twitter.com/yuksF9ZTMi
— Farid Khan (@_FaridKhan) August 27, 2023
Picture of the day 🇮🇳
— Johns. (@CricCrazyJohns) August 27, 2023
Neeraj Chopra with the Gold medal & waving Indian flag. pic.twitter.com/LvmSgqEq4y
भारतीय दिग्गज खेळाडूने तिसऱ्या फेरीत 86.32 मीटर अंतर पार केले. त्याचवेळी या फेरीनंतर पाकिस्तानचा अर्शद नदीम 87.82 गुणांसह दुसरा आला. पाकिस्तानच्या अर्शद नदीमला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. याआधी नीरज चोप्राने ऑलिम्पिकशिवाय डायमंड लीगमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. त्याचबरोबर आता नीरजने जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकून मोठा विक्रम केला आहे.
मात्र 4x400 मीटर रिले शर्यतीत भारतीय खेळाडूंनी निराशा केली. 4x400 मीटर रिले शर्यतीत भारत पाचव्या स्थानावर राहिला. या शर्यतीत अमेरिकेने सुवर्णपदक जिंकले. तर फ्रान्सने रौप्यपदक जिंकले. तर ग्रेट ब्रिटनला कांस्यपदक जिंकण्यात यश आले.
महत्त्वाच्या बातम्या :