एक्स्प्लोर
Satara Vidhan Sabha 2024 : बाबांच्या प्रचारासाठी छत्रपतींची लेक भाजी मंडईत येते तेव्हा....
Satara Vidhan Sabha 2024 : साताऱ्यातील छत्रपती घराण्याची चौथी पिढी देखील आता राजकारणात उतरली आहे. शिवेंद्रराजेंच्या मुलीने भल्या सकाळी भाजी मंडईतून प्रचाराला सुरुवात केली आहे.

Mrunaliraje Bhosale Prachar in Bhaji Mandai
1/10

भाजपचे उमेदवार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांची कन्या प्रचारासाठी पहिल्यांदाच मैदानात उतरली आहे.
2/10

आपल्या बाबासाठी मृणालीराजे मैदानात उतरली आहे, साताऱ्यातील भाजी मंडईतून भल्या सकाळी तिने प्रचाराला सुरुवात केली.
3/10

मृणालीराजे पहिल्यांदाच राजकारणात उतरली आहे. छत्रपती घराण्यातील चौथ्या पिढीनेही आता राजकारणाचा विडा उचलला आहे आणि प्रचाराला सुरुवात केली आहे.
4/10

सकाळी कार्यकर्त्यांसमवेत भाजी मंडईत येऊन शिवेंद्रराजेंच्या कन्येने भाजीवाल्यांशी संवाद साधला.
5/10

बाबा बहुमताने निवडून यावा यासाठी लेक रणांगणात उतरली आहे, याआधी मृणालीराजे राजकारणापासून दूर होती.
6/10

शिवेंद्रराजेंना तुमचं मोलाचं मत द्या, असं आवाहन तिने भाजीवाल्यांना केलं.
7/10

प्रचारादरम्यान मृणालीराजेने शिवेंद्रराजेंच्या चिन्हाचं आणि माहितीचं पॅम्पलेट सर्वांना दिलं.
8/10

सातारा विधानसभेसाठी महायुतीतून शिवेंद्रसिंहराजे भोसले, ठाकरे गटाचे अमित कदम, रिपाइंमधून (आठवले गट) हणमंत तुपे तसेच अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
9/10

साताऱ्यात आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल करतानाही रॅली काढून जोरदार शक्तिप्रदर्शन केलं होतं.
10/10

वडिलांच्या प्रचारासाठी पहिल्यांदाच मुलगी मृणालीराजे राजकारणाच्या आखाड्यात उतरली आहे.
Published at : 07 Nov 2024 08:20 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
भारत
नाशिक
छत्रपती संभाजी नगर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion