एक्स्प्लोर

Indian Railway : एकटी महिला विना टिकीट ट्रेनमधून प्रवास करत असेल तर टीसी तिला खाली उतरवू शकतो का? वाचा काय आहे नियम

Woman Travelling Without Ticket Rule : विना टिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना टीसी आर्थिक दंड लावून त्यांना पुढच्या स्टेशनवर उतरवू शकतो. पण एकटी महिला प्रवासी असेल तर तिच्याबाबत वेगळा नियम आहे. 

मुंबई: भारतीय रेल्वेचा प्रवास (Indian Railway) म्हणजे एकदम स्वस्तात मस्त आणि तुलनेने अधिक आरामदायी. त्यामुळे रेल्वेने दररोज लाखो लोक प्रवास करतात. अशा परिस्थितीत प्रत्येकाला तिकीट मिळणे शक्य नसतं. काहीवेळा वेटिंगमुळे अनेकांची तिकिटे कन्फर्म होत नाहीत, त्यामुळे लोक विना तिकीट ट्रेनने प्रवास करण्याच्या घटना घडतात. वास्तविक विना तिकीट प्रवास करणे हा दंडनीय गुन्हा आहे आणि टिकीट चेकर तुम्हाला ट्रेनमधूनही बाहेर उतरवू शकतो. त्याचबरोबर विना तिकीट प्रवास केल्यास आर्थिक दंडासोबत तुरुंगापर्यंतची शिक्षा आहे. आता प्रश्न असा पडतो की एखादी महिला प्रवासी विना तिकीट ट्रेनमध्ये प्रवास करत असेल तर टिकीट चेकर तिलाही ट्रेनमधून खाली उतरवणार का? त्यामुळे याबाबत रेल्वेचा काय निर्णय आहे ते पाहुया.

विना तिकीट प्रवास केल्यास टीसी काय करू शकतो? 

जर एखादा प्रवासी विना तिकीट ट्रेनमध्ये प्रवास करताना पकडला गेला तर टीसी त्याला कोचच्या गेटवर उभे करतो आणि ट्रेन थांबलेल्या पुढील स्टेशनवर तो प्रवाशाला डब्यातून खाली उतरवतो. यासाठी अनेक वेळा आरपीएफ किंवा जीआरपीची मदत घ्यावी लागते. पण जर एखादी महिला एकटी असेल आणि तिने तिकीट काढले नसेल तर तिच्यासोबतही असेच वागता येईल का?

एकट्या महिला प्रवाशासाठी हे नियम आहेत (Rule For Woman Travelling Without Ticket) 

विना टिकीट एखादी एकटी महिला प्रवास करत असेल तर त्याबाबत रेल्वेचे नियम थोडे वेगळे आहेत. चेकिंग दरम्यान ती तिकीटाशिवाय आढळल्यास एकाकी महिलेला रात्री अपरात्री कोणत्याही रिकाम्या स्थानकावर डब्यातून उतरवता येणार नाही. याशिवाय दिवसभरातही तिच्या सुरक्षिततेला धोका असेल अशा कोणत्याही स्थानकावर तिला डब्यातून खाली उतरवता येत नाही. टीटीने तिला ट्रेनमधून बाहेर काढले तरीही तिला सुरक्षित ठिकाणी नेण्याची जबाबदारी जीआरपी किंवा आरपीएफची असेल.

जवान महिलेला एस्कॉर्ट करतील आणि तिला जिथे सोडले असेल तिथे ती सुरक्षित आहे याची खात्री करतील. त्यानंतरच जीआरपी किंवा आरपीएफचे जवान ट्रेनमध्ये परततील.

इतर प्रवाशांसोबत मात्र टीसी रेल्वेच्या नियमानुसार कारवाई करू शकतो. विना टिकीट रेल्वे प्रवास केल्यास आर्थिक दंड लागू शकतो आणि रेल्वेतून खालीही उतरवले जाऊ शकते.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी, राज्य सरकारकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या अन् पदोन्नती, सूरज मांढरे कृषी विभागाचे नवे आयुक्त
मोठी बातमी, राज्य सरकारकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या अन् पदोन्नती, सूरज मांढरे कृषी विभागाचे नवे आयुक्त
Walmik Karad : दोन्ही बाजूनं 30 मिनिटं जोरदार युक्तिवाद,केज कोर्टात काय घडलं? सरकारी वकील अन् कराडांचे वकील काय म्हणाले?
खंडणीच्या तक्रारीत 2 कोटींचा उल्लेखचं नाही, वाल्मिक कराडांच्या वकिलांचा कोर्टात कोणता युक्तिवाद?
New Year 2025 Wishes : नवीन वर्षाच्या प्रिय व्यक्तींना द्या 'या' हटके शुभेच्छा; पाठवा 'हे' खास शुभेच्छा संदेश
नवीन वर्षाच्या प्रिय व्यक्तींना द्या 'या' हटके शुभेच्छा; पाठवा 'हे' खास शुभेच्छा संदेश
पर्यटकांचा कुडाळमध्ये धिंगाणा! मुंबईतील पर्यटकांनी स्थनिकांना केली मारहाण, प्रकरण गेलं पोलिस ठाण्यात
पर्यटकांचा कुडाळमध्ये धिंगाणा! मुंबईतील पर्यटकांनी स्थनिकांना केली मारहाण, प्रकरण गेलं पोलिस ठाण्यात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Police Custody : कराड गजाआड! पोलीस कोठडीनंतर वाल्मिकच्या वकिलांची मोठी प्रतिक्रियाWelcome 2025 : वेलकम 2025, नव्या वर्षाचं उत्साहात स्वागत, उत्साह शिगेलाRajikya Shole Special Report Walmik Karad : वाल्मिक कराड शरण, A टू Z घटनाक्रम काय?Rajikya Shole Special Report on Walmik Karad : वाल्मिक कराडची शरणागती, विरोधकांचा संशय कुणावर?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी, राज्य सरकारकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या अन् पदोन्नती, सूरज मांढरे कृषी विभागाचे नवे आयुक्त
मोठी बातमी, राज्य सरकारकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या अन् पदोन्नती, सूरज मांढरे कृषी विभागाचे नवे आयुक्त
Walmik Karad : दोन्ही बाजूनं 30 मिनिटं जोरदार युक्तिवाद,केज कोर्टात काय घडलं? सरकारी वकील अन् कराडांचे वकील काय म्हणाले?
खंडणीच्या तक्रारीत 2 कोटींचा उल्लेखचं नाही, वाल्मिक कराडांच्या वकिलांचा कोर्टात कोणता युक्तिवाद?
New Year 2025 Wishes : नवीन वर्षाच्या प्रिय व्यक्तींना द्या 'या' हटके शुभेच्छा; पाठवा 'हे' खास शुभेच्छा संदेश
नवीन वर्षाच्या प्रिय व्यक्तींना द्या 'या' हटके शुभेच्छा; पाठवा 'हे' खास शुभेच्छा संदेश
पर्यटकांचा कुडाळमध्ये धिंगाणा! मुंबईतील पर्यटकांनी स्थनिकांना केली मारहाण, प्रकरण गेलं पोलिस ठाण्यात
पर्यटकांचा कुडाळमध्ये धिंगाणा! मुंबईतील पर्यटकांनी स्थनिकांना केली मारहाण, प्रकरण गेलं पोलिस ठाण्यात
वाल्मिक अण्णा उज्जैनला होते, तिथून चाकू फेकून हाणला काय? कराडच्या हाडाच्या कार्यकर्त्याचा सवाल
वाल्मिक अण्णा उज्जैनला होते, तिथून चाकू फेकून हाणला काय? कराडच्या हाडाच्या कार्यकर्त्याचा सवाल
IPO Update : यूनिमेक एअरोस्पेसनं शेवट गोड केला, 85 टक्के प्रीमियमसह लिस्ट, गुंतवणूकदारांचं लक्ष इंडो फार्मच्या आयपीओकडे, GMP कितीवर?
यूनिमेक एअरोस्पेसचा आयपीओ 85 टक्के प्रीमियमसह लिस्ट, इंडो फार्मचा IPO पहिल्याच दिवशी 17 पट सबस्क्राइब, GMP कितीवर?
चिमण्या 'कोंबड्यावर जडला जीव', चिकन खाणंही सोडलं; 31 डिसेंबर दिवशीच साजरा झाला 5 वा बर्थ डे
चिमण्या 'कोंबड्यावर जडला जीव', चिकन खाणंही सोडलं; 31 डिसेंबर दिवशीच साजरा झाला 5 वा बर्थ डे
सूर्यास्त रोजचाच, पण आज जरा वेगळा; 2024 चा ढलता सूरज धीर धीरे, भावूक क्षण  कॅमेऱ्यात कैद
सूर्यास्त रोजचाच, पण आज जरा वेगळा; 2024 चा ढलता सूरज धीर धीरे, भावूक क्षण कॅमेऱ्यात कैद
Embed widget