एक्स्प्लोर

Viral News : मृत्यूच्या नंतर सहाव्या दिवशी झाली जिवंत! शवपेटीतून बाहेर येऊन चालू लागली महिला; नेमकं काय घडलं?

Women Death Viral Story : महिला झोपेत असताना तिचा मृत्यू झाला असल्याचं शेजाऱ्यांना वाटलं. महिलेला झोपेतून उठवण्याचा प्रयत्न केला, पण ती जागी झाली नाही.

Women Death Trending News : मृत्यू (Death) अटळ आहे. एकदा मृत्यू झाला की, ती व्यक्ती पुन्हा परत येणं कठीण आहे. बॉलिवूड चित्रपटांध्ये तुम्ही अनेकदा पुनर्जन्म किंवा मृत व्यक्ती पुन्हा जिवंत झाल्याचं पाहिलं असेल. पण, असं खऱ्या आयुष्यात घडलं तर तुम्ही काय कराल. अशीच काहीशी विचित्र घटना समोर आली आहे. एक मृत झालेली महिला मृत्यूच्या सहा दिवसांनी अचानक जिवंत झाली. नक्की काय घडलं जाणून घ्या.

मृत्यूनंतर सहाव्या दिवशी झाली जिवंत! 

एक 95 वर्षीय वृद्ध महिला तिच्या मृत्यूनंतर सहाव्या दिवशी शवपेटीतून बाहेर आलेली पाहून सर्वांनाच धक्का बसला. ही विचित्र घटना चीनमधील गुआंग्शी प्रांतातील असल्याचं सांगितलं जात आहे. महिला झोपेत असताना तिचा मृत्यू झाल्याचं तिच्या शेजाऱ्यांना वाटलं. शेजाऱ्यांनी महिलेला झोपेतून जागे करण्याचा खूप प्रयत्न केला पण, ती काही जागी झाली नाही. यानंतर शेजाऱ्यांनी तिला मृत समजून तिच्या अंत्यसंस्काराची तयारी केली. त्यानंतर सहाव्या दिवशी तिच महिला स्वयंपाक घरात जेवण बनवताना दिसल्यावर शेजाऱ्यांना मोठा धक्काच बसला.

शवपेटीतून बाहेर येऊन चालू लागली महिला

डेली स्टारच्या वृत्तानुसार, चीनमधील ली झ्युफेंग नावाच्या 95 वर्षीय महिलेच्या डोक्याला दुखापत झाली होती, त्यानंतर ती घरात पडलेल्या अवस्थेत आढळली. शेजाऱ्यांनी तिला शुद्धीवर आणण्याचा खूप प्रयत्न केला पण, त्यांचे सर्व प्रयत्न व्यर्थ गेले. महिलेचे शरीर थंड पडलं नव्हतं पण तिचा श्वासोच्छवास सुरु नव्हता आणि ती शुद्धीवरही आली नाही. यामुळे वृद्ध महिलेचा झोपेतच मृत्यू झाल्याचं शेजाऱ्यांना वाटलं. या वृद्ध महिलेचा शेजारी स्वत: 60 वर्षांचा आहे. या शेजाऱ्याने सांगितलं की, त्याने महिलेला हलवून तिला उठवण्याचा खूप प्रयत्न केला पण ती उठली नाही. महिला एकटीच राहत असल्याने शेजारी राहणाऱ्या कुटुंबीयांनीही तिच्या अंत्यसंस्काराची व्यवस्था केली.

नेमकं काय घडलं?

महिलेचा मृतदेह एका शवपेटीत ठेवण्यात आला. मित्र आणि नातेवाईकांना त्यांचे शेवटचे दर्शन घेता यावं, यासाठी महिलेचा मृतदेह काही दिवस तिच्या घरी ठेवण्यात आला. शवपेटी बंद करण्यात आली नव्हती. सहा दिवसांनी जेव्हा शेजारी शवपेटी दफन करण्यासाठी आले तेव्हा ती रिकामी होती आणि आतमध्ये महिलेचा मृतदेह नव्हता. एवढंच नाही तर ती महिला किचनमध्ये स्टूलवर बसून जेवण बनवताना दिसली. हे पाहून शेजाऱ्याला त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता आणि तो खूप घाबरला. नंतर महिलेनं सांगितलं की, बराच वेळ झोपल्यानंतर तिला भूक लागली होती, म्हणून ती स्वयंपाकघरात काहीतरी बनवण्यासाठी गेली. डॉक्टरांनी या प्रकाराला कृत्रिम मृत्यू म्हटलं आहे, ज्यामध्ये शरीरात श्वासोच्छवास होत नाही, पण शरीर थंडही पडत नाही.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Viral News : क्रिकेटच्या मैदानात नेत्याची जोरदार बॅटिंग, पण शॉट मारताना गेला तोल; तोंडावर पडतानाचा मजेदार Video व्हायरल

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 07 July 2024Navi Mumbai Rain Special Report : मुसळधार पावसानं नवी मुंबईला अक्षरश: धुतलंDada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
Embed widget