(Source: ECI/ABP News/ABP Majha)
GK: चंदन नाही, तर 'हे' आहे जगातील सर्वात महाग झाड; किंमत ऐकून विश्वास ठेवणं होईल कठीण
एजेड अॅनिमल्स नावाच्या वेबसाईटच्या रिपोर्टनुसार, जपानच्या काटो कुटुंबात 1000 वर्ष जुने बोन्साय झाड आहे. या झाडाची किंमत सुमारे 16 कोटी रुपये आहे.
GK: आपण जेव्हा जगातील महागड्या वस्तूंबद्दल बोलतो, त्यावेळी त्यात घर (House), गाडी (Vehicle) किंवा दागिन्यांचा (Ornaments) समावेश आवर्जून होतो. पण तुम्हाला माहीत आहे का, या जगात एक असं झाड (Tree) देखील आहे ज्याची किंमत या सर्व गोष्टींपेक्षा जास्त आहे? आपण लहानपणापासून चंदनाचं झाड हे सर्वात महाग असल्यातं ऐकत आलो आहे. पण जगात त्याहूनही अधिक महागडी झाडं (Expensive Trees) आहेत. अशाच एका झाडाबद्दल आज जाणून घेऊया.
जगातील सर्वात महाग झाड कोणतं?
अशी बरीच झाडं आहेत, जी जगातील सर्वात महाग झाडं असल्याचं लोक सांगतात. पण जर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनुसार (Guinness World Records) बोलायचं झालं तर, जगातील सर्वात महाग झाड 'स्टाकसपर्र गोल्डन डिलिशियस अॅपल ट्री' (Starkspur Golden Delicious Apple Tree) हे आहे. हे एक सफरचंदाचं झाड (Apple Tree) आहे. जगातील सर्वात महाग झाडाचा विक्रम याच झाडाच्या नावावर आहे.
1959 मध्ये जेव्हा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या झाडाचं नाव नोंदवलं गेलं होतं, तेव्हा या झाडाची किंमत 51 हजार डॉलर होती. भारतीय रुपयांत बोलायचं झाल्यास याची किंमत 42 लाख रुपये होती. आज याच झाडाची किंमत पाहायला गेलो तर ती याहूनही जास्त असेल.
बोन्साय झाडाची किंमतही जास्त
एजेड अॅनिमल्स नावाच्या वेबसाईटच्या रिपोर्टनुसार, जपानच्या काटो फॅमिलीत 1000 वर्ष जुनं बोन्साय झाड आहे. या झाडाची किंमत सुमारे 16 कोटी रुपये आहे. मात्र, या झाडाचं नाव अद्याप गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलं गेलं नाही. बोन्साय, ज्याला मराठीत वामनवृक्षही म्हटलं जातं. हे खुंटलेलं झाड घरात सजावटीसाठी वापरलं जातं. घरातील टेबलावर अथवा खिडकीवर हे छोटेसं वृक्ष तुमच्या घराची शोभा वाढवतं.
या झाडांची नावंही यादीत समाविष्ट
सर्वात महाग झाडांमध्ये काही लोक 'मारिया डी लॉस एंजेलिस'चं नाव घेतात. हे झाड देखील सुमारे 700 वर्षं जुनं आहे. कृत्रिम तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हे झाड जिवंत ठेवण्यात आल्याचं लोकांचं म्हणणं आहे. तर, 'आफ्रिकन ब्लॅकवुड ट्री' हे देखील जगातील सर्वात महागडं झाड असल्याचं म्हटलं जातं. त्याच्या एक किलो लाकडाची किंमत 10,000 डॉलर इतकी आहे.
हेही वाचा:
Mumbai local: कन्फ्युजन ही कन्फ्युजन है, कसारासाठी K ऐवजी N आणि कर्जतसाठी K ऐवजी S का लिहितात?