Mumbai local: कन्फ्युजन ही कन्फ्युजन है, कसारासाठी K ऐवजी N आणि कर्जतसाठी K ऐवजी S का लिहितात?
Mumbai Local Indicator: मुंबईत लोकलने प्रवास करणाऱ्या अनेकांना प्रश्न पडला असेल की, कसारा ट्रेनसाठी इंडिकेटरवर N आणि कर्जत ट्रेनसाठी इंडिकेटरवर S का दर्शवतात? तर पाहूया...
मुंबई: लोकल ट्रेन (Local Train) ही मुंबईकरांचा श्वास आहे. मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी मुंबई लोकल (Mumbai Local) ही सर्वच मुंबईकरांना परिचित आहे. मुंबई लोकलने दर दिवशी सुमारे 85 लाख लोक प्रवास करतात. या सर्व लोकांच्या सोयीसाठी रेल्वेने विविध स्थानकांच्या लोकल ट्रेनला काही कोड दिले आहेत, जे ट्रेन येण्याआधी आपल्याला इंडिकेटरवर (Indicator) दिसतात.
जवळ जवळ इंडिकेटरवर दर्शवण्यात येणारे सर्वच कोड हे त्या त्या स्थानकाच्या नावाच्या सुरुवातीच्या अक्षराने देण्यात आले आहेत. जसं, चर्चगेट (Churchgate) स्थानकासाठी C, दादर (Dadar) स्थानकासाठी D, अंधेरीसाठी (Andheri) A, ठाणे (Thane) स्थानकासाठी T, कल्याण (Kalyan) स्थानकासाठी K असे कोड देण्यात आले आहेत.
तर मग, इंडिकेटरवर कर्जत 'S' आणि कसारा स्थानक 'N' अक्षराने का दर्शवलं जातं? हा प्रश्न कधी तुम्हाला पडला आहे का? त्याच प्रमाणे, पश्चिम रेल्वेच्या वसई रोड (Vasai Road) स्थानकासाठी 'BS' हा कोड का? तर आज या प्रश्नांचीच उत्तरं जाणून घेऊया.
कर्जतसाठी S आणि कसारासाठी N का?
खरं तर, कर्जत आणि कसारा ही दोन्ही मुंबई लोकलची शेवटची स्थानकं (Last Stations) आहेत. मुंबई आणि पुण्याच्या मध्यावर असलेलं स्टेशन म्हणजे कर्जत (Karjat), तसेच मुंबई आणि नाशिकच्या मध्यावर असलेलं स्टेशन म्हणजे कसारा (Kasara). ही दोन्ही स्थानकं मुंबईला जोडली गेलेली आहेत, म्हणून कल्याण स्टेशनपासून दक्षिणेला (South) असलेल्या कर्जत स्टेशनला 'S' हा कोड आणि उत्तरेला (North) असलेल्या कसारा स्टेशनला 'N' हा कोड देण्यात आला.
वसई रोडला BS हा कोड का बरं?
लोकल इंडिकेटरवर वसई रोड (Vasai Road) स्टेशनला BS हा कोड देण्यात आला आहे, कारण वसईचं ब्रिटीश कालीन नाव हे बॅसिन (Basin) होतं. त्यामुळेच वसई रोडला 'BS' हा कोड देण्यात आला आहे.
कुर्ला ट्रेनसाठी देखील C कोड
त्याच प्रमाणे, कुर्ला (Kurla) ट्रेन देखील इंडिकेटरवर 'C' या अक्षराने दर्शवली जाते. कुर्ला स्टेशन देखील ब्रिटीश काळात बनलं असल्याने तत्कालीन ब्रिटीश अधिकारी कुर्ला स्थानकाचं स्पेलिंग 'Coorla' असं लिहायचे, त्यामुळे कुर्ला स्थानकासाठी इंडिकेटरवर 'C' हा कोड दर्शवण्यात येतो.
हेही वाचा: