एक्स्प्लोर
कर्नाटक पोलिसांना मिळालेली दहशतवादी हल्ल्याची माहिती खोटी, फोन करणाऱ्या व्यक्तीस पोलिसांकडून अटक
महाराष्ट्रासह देशातल्या 8 राज्यांमध्ये दहशतवादी हल्ल्याची माहिती देणारा फोन कॉल खोटा असून फोन करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती बंगळुरु ग्रामीणच्या पोलिस अधिक्षकांनी दिली आहे.

प्रातिनिधिक फोटो
मुंबई : महाराष्ट्रासह देशातल्या 8 राज्यांमध्ये दहशतवादी हल्ल्याची माहिती देणारा फोन कॉल खोटा असून फोन करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती बंगळुरु ग्रामीणच्या पोलिस अधिक्षकांनी दिली आहे.
स्वामी सुंदर मूर्ती नावाच्या एका व्यक्तीने शुक्रवारी बंगळुरु सिटीच्या कंट्रोल रूमला फोन करून देशातील 8 राज्यांमध्ये दहशतवादी हल्ला होणार असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर कर्नाटकच्या पोलीस महासंचालकांनी या संभाव्य हल्ल्याचं पत्र लिहून याबाबत यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. महाराष्ट्र, गोवा, तमिलनाडु, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगानासह 8 राज्यांना सुरक्षेबाबतचं पत्र पाठवण्यात आलं होत. परंतू फोन करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केल्यानंतर माहिती खोटी असल्याचे पोलिसांना कळाले. ज्या व्यक्तीने कर्नाटक पोलिसांना फोन केला तो एक ट्रक ड्रायव्हर असून पोलिसांकडून त्याची चौकशी सुरु आहे.
श्रीलंकेत इस्टर संडेला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतातही सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
भारत
व्यापार-उद्योग
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
