(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PureBook X14 सोबत Nokia ची लॅपटॉप जगतात एन्ट्री; काय आहेत फिचर्स?
Nokia ने आपला नवा PureBook X14 लॅपटॉप लॉन्च केला आहे. या लॅपटॉपमार्फत Nokia ने लॅपटॉप जगतात एन्ट्री घेतली आहे.
Nokia ने लॅपटॉप मार्केटमध्ये पाऊल ठेवलं आहे. ई-कॉमर्स फ्लिपकार्टने Nokia PureBook X14 लॅपटॉप लॉन्च केला आहे. नोकियाच्या या लॅपटॉपची किंमत 59,990 रुपये आहे. Nokia PureBook X14 चं प्री-बुकिंग 18 डिसेंबरपासून सुरु करण्यात आली होती. जाणून घेऊया या लॅपटॉपमधील फिचर्स...
Nokia PureBook X14 मधील फिचर्स
Nokia PureBook X14 लॅपटॉपमध्ये अल्ट्रा लाईट, पॉवरफुल आणि इमर्सिव फिचर्स मिळणार आहेत. या लॅपटॉपमध्ये 8 तासांची बॅटरी लाईफ देण्यात आली आहे. ही बॅटरी 65 वॉटच्या फास्ट चार्जिंग सपोर्टसोबत देण्यात आली आहे. कनेक्टिविटीसाठी यामध्ये ड्युअल बँड वाय-फाय, ब्लूटूथ 5.1, यूएसबी 3.1, यूएसबी 2.0, सिंगल HDMI पोर्ट आणि एक RJ45 पोर्ट देण्यात आला आहे. लॅपटॉपमध्ये सिंगल ऑडिओ आऊट पोर्ट आणि एक माईक पोर्टही देण्यात आला आहे.
साउंड क्वॉलिटी
Nokia PureBook X14 चं डिझाइनही क्लासी देण्यात आलं असून याचं वजन 1.1 किलोग्राम आहे. तर याची जाडी केवळ 16.8mm आहे. उत्तम साउंड क्वालिटीसाठी या लॅपटॉपमध्ये डॉल्बी ऑडियो सपोर्टही देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त क्लासी ग्राफिक्ससाठी यामध्ये 1.1 Ghz टर्बो GPU सोबत इंटीग्रेटेड इंटेल UHD 620 ग्राफिक्स कार्ड देण्यात आलं आहे.
या लॅपटॉपसोबत स्पर्धा
Nokia PureBook X14 ची स्पर्धा Lenovo आणि Dell यांसारख्या ब्रँड्ससोबत होणार आहे. Dell Vostro Core i5 10th Gen मॉडल ची किंमत सध्या फ्लिपकार्टवर 48,990 रुपये आहे. हा 8GB रॅम आणि 1TB HHD/256 GB SSD सोबत येणार आहे. तसेच यामध्ये विंडो 10 होम आणि MS ऑफिससोबत मिळतो. याव्यतिरिक्त लॅपटॉपचं वजन 1.66 किलोग्राम आहे. या लॅपटॉपमध्ये 14 इंचाचा Full HD LED डिस्प्ले मिळतो.
महत्त्वाच्या बातम्या :
- क्लासी फिचर्ससह 5 बजेट स्मार्टफोन्स; किंमत 15 हजारांहून कमी
- ट्रिपल रियर कॅमेऱ्यासोबत Moto G9 Power भारतात लॉन्च; Vivo Y51 सोबत थेट स्पर्धा
- चार कॅमेऱ्यांचा Vivo Y51 भारतात लॉन्च; अद्ययावत फिचर्ससह बजेट स्मार्टफोन
- Year Ender 2020 | यंदाच्या वर्षात लॉन्च झालेले 15 हजारांच्या रेंजमधील बजेट स्मार्टफोन्स
- भारतातील 5G कनेक्टिव्हिटी असणारे बेस्ट स्मार्टफोन्स; काय आहे फिचर्स आणि किंमत?
- आता मोबाईल टॉवर विसरा, 5G साठी थेट आकाशात विमान फिरत राहणार