(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ट्रिपल रियर कॅमेऱ्यासोबत Moto G9 Power भारतात लॉन्च; Vivo Y51 सोबत थेट स्पर्धा
मोटोरोलाने आपला बजेट स्मार्टफोन Moto G9 Power भारतात लॉन्च केला आहे. Moto G9 Power थेट स्पर्धा नुकत्याच लॉन्च झालेल्या Vivo Y51 सोबत होणार आहे.
मुंबई : Vivo ने आपला Vivo Y51 स्मार्टफोन लॉन्च केल्यानंतर मंगळवारी आणखी एक ट्रिपल रियर कॅमेरा स्मार्टफोन लॉन्च करण्यात आला. मोटोरोलाने आपला नवा स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. Moto G9 Power या एकमात्र 4GB रॅम + 128 GB स्टोरेज व्हेरियंटची भारतात किंमत 11 हजार 999 रुपये असणार आहे.
मोटो G9 पॉवर इलेक्ट्रिक वायलेट आणि मेटेलिक सेज कलर्समध्ये उपलब्ध होणार आहे. या स्मार्टफोनचा पहिला सेल 15 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. फोन फ्लिपकार्टच्या माध्यमातून खरेदी करता येणार आहे. जाणून घेऊया या स्मार्टफोनच्या खास फिचर्सबाबत...
Moto G9 Power चे फिचर्स :
- फोनमध्ये 6000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. जी 20 वॅट फास्ट चार्जिंग करते.
- मोटो G9 पॉवर ड्युअल नॅनो सिमला सपोर्ट करतो आणि अॅन्ड्राईड 10 वर काम करतो.
- फोनमध्ये 20.5:9 अॅस्पेक्ट रेशो असणारा 6.8 इंचाचा एचडी प्लस (720x1640 पिक्सल) आयपीएल डिस्प्ले देण्यात आला आहे.
- मोटो G9 पॉवर ऑक्टा-कोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 662 प्रोसेसरयुक्त आहे. जो 4GB रॅमसोबत जोडण्यात आला आहे.
- फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये f/1.79 लेंससोबत 64MP चा प्रायमरी सेंसर, f/2.4 मॅक्रो लेंससोबत 2MP चा सेकेंडरी सेंसर आणि f/2.4 सोबत 2MP चा डेप्थ सेंसरचा समावेश आहे.
- मोटो G9 पॉवर फ्रंटमध्ये 16-मेगापिक्सल कॅमेरा सेंसरसहित देण्यात आला आहे.
- यामध्ये 128 जीबीचा ऑनबोर्ड स्टोरेज देण्यात आला आहे. जो मायक्रो-एसडी कार्डने 512 जीबीपर्यंत वाढवता येऊ शकतो.
- कनेक्टिविटीचा ऑप्शन पाहायचं झालं तर यामध्ये 4G LTE, वायफाय 802.11ac,ब्लूटूथ वर्जन 5.0, जीपीएस/ए-जीपीएस, एनएफसी, यूएसबी टाइप-सी आणि एक 3.5 एमएम हेडफोन जॅक देण्यात आला आहे.
Vivo Y51 शी होणार स्पर्धा
Moto G9 Power ची थेट स्पर्धा नुकत्याच लॉन्च झालेल्या Vivo Y51 सोबत होणार आहे. स्मार्टफोन्सच्या फिचर्सबाबत बोलायचे झाले तर विवो वाय 51 मध्ये तीन रियर कॅमेरा आणि एक सेल्फि कॅमेरा देण्यात आला आहे. याचा प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सलचा आहे. तर दोन सेंसर कॅमेरे आठ आणि दोन मेगापिक्सलचे आहेत. तसेच सेल्फी कॅमेरा 16 मेगापिक्सलचा आहे. हा स्मार्टफोन कंपनी दोन कलर टायटेनियम सफायर आणि क्रिस्टल सिम्फनीमध्ये उपलब्ध करणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- चार कॅमेऱ्यांचा Vivo Y51 भारतात लॉन्च; अद्ययावत फिचर्ससह बजेट स्मार्टफोन
- Year Ender 2020 | यंदाच्या वर्षात लॉन्च झालेले 15 हजारांच्या रेंजमधील बजेट स्मार्टफोन्स
- भारतातील 5G कनेक्टिव्हिटी असणारे बेस्ट स्मार्टफोन्स; काय आहे फिचर्स आणि किंमत?
- आता मोबाईल टॉवर विसरा, 5G साठी थेट आकाशात विमान फिरत राहणार
- 2021च्या उत्तरार्धात भारतात '5G' सेवा लॉन्च करणार जियो; मुकेश अंबानी यांची मोठी घोषणा