क्लासी फिचर्ससह 5 बजेट स्मार्टफोन्स; किंमत 15 हजारांहून कमी
भारतात बजेट फोन्सचा खप मोठ्या प्रमाणावर होतो. अशातच आज आम्ही तुम्हाला अशा स्मार्टफोन्सबाबात सांगणार आहोत, ज्यांची किंमत 15 हजार रुपयांपेक्षा कमी आहे, पण फिचर्सच्या बाबतीते हे स्मार्टफोन्स अनेक बड्या कंपन्यांनाच्या फोन्सलाही मागे टाकतात.
मुंबई : भारतीय बाजारात नेहमीच बजेट स्मार्टफोनचा दबदबा असतो. सेल्फीच्या शौकीन असणाऱ्या युजर्ससाठी सध्या कमी बजेटमध्ये अगदी उत्तम कॅमेरा क्वॉलिटी असणारे अद्ययावत फिचर फोन बाजारात उपलब्ध आहेत. अशातच आज आम्ही तुम्हाला अशा 5 स्मार्टफोन्सबाबत सांगणार आहोत, ज्यांची किंमत 15 हजार रुपयांपेक्षा कमी आहे आणि फिचर्सच्या बाबतीत हे फोन अनेक महागड्या स्मार्टफोन्सलाही मागे टाकत आहेत. यामध्ये सॅमसंग, रेडमी, रियलमी आणि ओप्पो यांसारख्या कंपन्यांना युजर्स जास्त पंसती देताना दिसत आहेत. या कंपन्यांच्या विक्रीमध्ये वाढ झाल्याचंही पाहायला मिळत आहे.
Redmi Note 9 Pro
रेडमीच्या या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा कोअर (2.3 GHz, Dual Core + 1.8 GHz, Hexa Core) स्नॅपड्रॅगन 720G प्रोसेसर देण्यात आला आहे. 6.67 इंचांचा मोठा डिस्प्ले या फोनला क्लासी लूक देण्यास मदत करतो. फोनचा रियर कॅमेरा 48+8+5+2MP अशा चार कॅमेरा सेटअपसोबत देण्यात आला आहे. तसेच सेल्फीसाठी 16MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये देण्यात आलेली 5020 mAh क्षमतेची बॅटरी फास्ट चार्जिंगसाठी मदत करते. याची किंमत 12,999 रुपये एवढी ठेवण्यात आली आहे.
Realme 6
रेडमीच्या या फोनमध्ये Octa core MediaTek Helio G90T प्रोसेसर देण्यात आला आहे. 6.5 इंचाचा डिस्प्लेसोबत फोनचा रिफ्रेश रेट 90 Hz आहे. यामध्ये चार कॅमेऱ्यांचा (64+8+2+2 MP) प्रायमरी सेटअप देण्यात आला आहे. त्याचसोबत सेल्फीसाठी 16 MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यामध्ये अनेक फिचर्सही आहेत. फोनमध्ये 4300 mAh बॅटरी देण्यात आली आहे. याची किंमत 13,904 रुपये आहे.
Samsung Galaxy M21
सॅमसंगच्या या फोनमध्ये ऑक्टा कोअर (2.3 GHz, Quad Core + 1.7 GHz, Quad core) Samsung Exynos 9 Octa प्रोसेसर आहे. यामध्ये 6.4 इंचांचा फुल एचडी प्लस सुपर एमोलेड डिस्प्ले आहे. ज्याचं रिझॉल्यूशन 1080x2340 पिक्सल आहे. फोटोग्राफीसाठी यामध्ये ट्रिपल कॅमेरा (48MP+8MP+5MP) सेटअप देण्यात आला आहे. सेल्फीसाठी 20MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये 6000 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. या फोनची किंमत 13,999 रुपये आहे.
OPPO A53 2020
या फोनमध्ये ऑक्टा कोअर (1.8 GHz, Quad Core + 1.6 GHz, Quad core) Snapdragon 460 प्रोसेसर आहे. 6.5 इंचाचा IPS LCD डिस्प्ले आहे. ज्याचं रिफ्रेश रेट 90 Hz आहे. यामध्ये 13MP +2MP +2 MP चा ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे आणि सेल्फीसाठी 16MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. 5000 mAh ची बॅटरी या स्मार्टफोनमध्ये देण्यात आलेली आहे. याची किंमत 12,989 रुपये आहे.
Realme Narzo 10
या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. डिस्प्लेच्या सेफ्टीसाठी 2.5D कॉर्निंग गोरिल्ला ग्लास देण्यात आला आहे. परफॉर्मंन्ससाठी यामध्ये ऑक्टा कोअर मीडियाटेक गीलियो G80 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन अॅन्ड्रॉईड 10 वर बेस्ड रियलमी यूआय ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. या स्मार्टफोनसोबत 5,000 mAh ची बॅटरी देण्यात आलेली आहे. जी 18W च्या फास्ट चार्जिंग सपोर्टसोबत मिळते. Realme Narzo 10 4GB रॅम असणाऱ्या व्हेरियंटची किंमत 12,382 रुपये आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- ट्रिपल रियर कॅमेऱ्यासोबत Moto G9 Power भारतात लॉन्च; Vivo Y51 सोबत थेट स्पर्धा
- चार कॅमेऱ्यांचा Vivo Y51 भारतात लॉन्च; अद्ययावत फिचर्ससह बजेट स्मार्टफोन
- Year Ender 2020 | यंदाच्या वर्षात लॉन्च झालेले 15 हजारांच्या रेंजमधील बजेट स्मार्टफोन्स
- भारतातील 5G कनेक्टिव्हिटी असणारे बेस्ट स्मार्टफोन्स; काय आहे फिचर्स आणि किंमत?
- आता मोबाईल टॉवर विसरा, 5G साठी थेट आकाशात विमान फिरत राहणार
- 2021च्या उत्तरार्धात भारतात '5G' सेवा लॉन्च करणार जियो; मुकेश अंबानी यांची मोठी घोषणा