एक्स्प्लोर
24 तासात 1 लाख यूनिटची विक्री, मोटो ई 4 प्लसचा विक्रम
लेनोव्होचा मोटो ई 4 प्लस भारतात लाँच होताच या फोनने विक्रीचा विक्रमी आकडा गाठला आहे. या स्मार्टफोनच्या 1 लाख यूनिटची पहिल्या 24 तासात विक्री झाली. तर पहिल्या 60 मिनिटांमध्ये प्रति मिनिट 580 यूनिट विकले गेले, असा दावा फ्लिपकार्टने केला आहे.
मुंबई : लेनोव्होचा मोटो ई 4 प्लस भारतात लाँच होताच या फोनने विक्रीचा विक्रमी आकडा गाठला आहे. या स्मार्टफोनच्या 1 लाख यूनिटची पहिल्या 24 तासात विक्री झाली. तर पहिल्या 60 मिनिटांमध्ये प्रति मिनिट 580 यूनिट विकले गेले, असा दावा फ्लिपकार्टने केला आहे.
मोटो ई 4 प्लस बुधवारी लाँच झाल्यानंतर रात्री 11.59 मिनिटांनी फ्लिपकार्टवर विक्री सुरु झाली. विक्री सुरु होताच जवळपास दीड लाख ग्राहकांनी पेजला भेट दिली, असा दावा फ्लिपकार्टने केला आहे.
मोटो ई 4 प्लसची भारतातील किंमत आणि लाँचिंग ऑफर्स :
मोटो ई 4 प्लसची भारतातील किंमत 9 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन देशभरात 32 GB स्टोरेज आणि 3 GB रॅम व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. मोटो ई 4 प्लस खरेदी करतांना मोटो प्लस 2 चे 1599 रुपये किंमतीचे हेडफोन 749 रुपयांत मिळणार आहेत.
याशिवाय हॉटस्टार प्रीमियम सबस्क्रिप्शन मोफत मिळेल. आयडिया ग्राहकांना 443 रुपयात तीन महिन्यांसाठी 84 जीबी डेटा दिला जाईल. जिओच्या ग्राहकांना जिओ प्राईम अधिक 30 जीबी अतिरिक्त डेटा मिळणार आहे. तर या फोनवर 9 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक ऑफर आणि 4 हजार रुपयांच्या बायबॅक गॅरंटीचीही कंपनीने घोषणा केली आहे.
मोटो ई 4 प्लसचे फीचर्स :
- अँड्रॉईड 7.1.1 नॉगट सिस्टम
- 5.5 इंच आकाराची स्क्रीन
- मीडियाटेक एमटीके 6737 एम प्रोसेसर
- फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh क्षमतेची बॅटरी
- 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
- स्वतंत्र मायक्रो एसडी कार्ड स्लॉट
- 3GB रॅम, 32 GB स्टोरेज
- 4G VoLTE
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement