iPhone 12 ची उत्सुकता वाढली; लॉन्चिंगबाबत कंपनीकडून मोठी घोषणा
Apple आपला नवा आयफोन चार व्हेरियंट्ससोबत मार्केटमध्ये लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. अॅपल यंदा आयफोन 12 सीरीजअंतर्गत चार नवे आयफोन लॉन्च करण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये दोन प्रीमियम व्हेरिएंट्सचा समावेश असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सॅन फ्रान्सिस्को : अॅपल आपली मोस्ट अवटेड सीरीज आयफोन 12 लवकरच लॉन्च करू शकते. पुढच्या महिन्यात 13 ऑक्टोबर रोजी अॅपल iPhone 12 लॉन्च करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अॅपल इनसायडर रिपोर्टनुसार, अॅपल इंटरनेट सॉफ्टवेअर अँड सर्विसचे सिनियर वाइस प्रेसिंडेंट अॅडी क्यू आगामी आयफोन आणि त्याच्या 5जी क्षमतेबाबत यूके कॅरियर प्रेझेंटेशनमध्ये बोलल्याचं सांगितलं जात आहे.
प्रेझेंटेशन दरम्यान ब्रिटिश टेलिकॉमचे सीईओ मार्क अल्लेरा यांनी प्रेझेंटेशन दरम्यान कर्मचाऱ्यांना सांगितलं की, "आपण अॅपलच्या पुढिल 5जी आयफोनपासून काही दिवसच लांब आहोत. 5जी इनोवेशनसाठी हा फोन मोठा बूस्ट असणार आहे. याला लॉन्च करण्यासाठी कंज्युमरने वर्षभरासाठी तयारी केली आहे. तसेच अॅपलचा युरोपमधील नंबर वन पार्टनर बनण्यासाठीही तयार आहे."
ही असू शकते किंमत
अॅपल यंदा आयफोन 12 सीरीजअंतर्गत चार नवे आयफोन लॉन्च करण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये दोन प्रीमियम व्हेरिएंट्सचा समावेश असण्याची शक्यता आहे. काही दिवसापूर्वीच खुलासा झाला आहे की, अपकमिंग 5.4 इंच डिस्प्ले असणाऱ्या आयफोन 12 ची सुरुवातीची किंमत 649 डॉलर एवढी असू शकते. तसेच 6.1 इंचाचा डिस्प्ले असणाऱ्या आयफोन 12 ची किंमत 749 डॉलर इतकी असू शकते.
5.4 इंच आणि 6.1 इंच असणारा आयफोन 5जी कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करेल. त्याचसोबत या फोनच्या रियर पॅनलवर ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात येईल. दोन्ही डिव्हाइसमध्ये फक्त स्क्रिन साइजचं अंतर असणार आहे. दोन्ही फोनमध्ये ओल्ड डिस्प्ले सपोर्ट करणार आहे.
iPhone 12 सीरीज अंतर्गत मार्केटमध्ये लॉन्च होऊ शकतात हे चार मॉडेल्स
iPhone 12 सीरीज अंतर्गत स्मार्टफोन्सचे हे चार मॉडल् मार्केटमध्ये उतरवले जाऊ शकतात. ज्यांची किंमत अपेक्षेपेक्षा जास्त सांगण्यात येत आहे. एका रिपोर्टनुसार, आयफोनच्या या सीरीजच्या किंमतींमध्ये जवळपास 50 डॉलर (सुमारे 3,680 रुपये) वाढ झाली आहे. हे पाहता अंदाज व्यक्त केला जाऊ शकतो की, iphone 12 सीरीजच्या किमती जास्त असू शकतात.
ही असेल iPhone 12 Pro Max ची किंमत
iPhone 12 चे दोन दुसरे मॉडल्स iPhone 12 आणि iPhone 12 pro असणार आहेत. यापैकी स्वस्त iPhone 12 Pro मॉडलची किंमत 999 डॉलर एवढी असण्याची शक्यता आहे. तर iPhone 12 Pro max जवळपास 1,099 डॉलर एवढ्या किमतीसह लॉन्च करण्याची शक्यता आहे. या दोन्ही फोन्सच्या रियर पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. जो LiDAR स्कॅनर सपोर्टसोबत येईल.
महत्त्वाच्या बातम्या :