iPhone 12 सीरीजमध्ये Apple लॉन्च करणार दोन स्वस्त फोन
अॅपल आपल्या iPhone 12 सीरीजमध्ये दोन स्वस्त आयफोन लॉन्च करणार असल्याचं बोललं जात आहे. तसेच मीडिया रिपोर्टनुसार, भारतात iPhone 12 चं प्रोडक्शन ऑक्टोबर 2020 पासून सुरु करण्यात येणार आहे.
मुंबई : अॅपल कंपनी आपली iPhone 12 सीरीज लवकरच लॉन्च करणार आहे. iPhone 12 सीरीज बाबात गेल्या अनेक दिवसांत लीक्स रिपोर्ट्स आणि डिटेल्स समोर आले आहेत. अशातच आता या सीरीजसंदर्भात आणखी एक माहिती समोर येत आहे. असं सांगण्यात येत आहे की, या सीरीजअंतर्गत कंपनी चार मॉडल्स लॉन्च करु शकते. ज्यामध्ये 2 बेसिक मॉडेल्स असणार आहेत. तसेच कंपनी दोन हाय एन्ड iphone लॉन्च करू शकते.
दोन स्वस्त मॉडेल्स लॉन्च
एका रिपोर्टनुसार, अॅपल यावेळी छोट्या स्क्रिनसोबत दोन मॉडल लॉन्च करू शकतं. यामध्ये 5.4 इंच आणि 6.1 इंच डिस्प्ले असणारे मॉडेल्स देण्यात येऊ शकतात. हे दोन्ही मॉडेल्स इतर iphone पेक्षा स्वस्त असू शकतात. परंतु, यांची किंमत किती असणार, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
लॉन्च होणार दोन हाय एन्ड आयफोन
कंपनी 12 सीरीजमध्ये बेसिक मॉडल्ससोबत दोन हाय एन्ड मॉडेल लॉन्च करू शकते. याची साइज 6.1 इंच आणि 6.7 इंच असू शकते. यामध्ये पहिल्यापेक्षा उत्तम OLED डिस्प्ले देण्यात येणार आहे. 6.7 इंच असणारा आयफोन या संपूर्ण सीरीजमधील सर्वात महाग आणि अधिक फिचर्स असणारा आयफोन असणार आहे. असा दावा करण्यात येत आहे की, आतापर्यंत लॉन्च करण्यात आलेल्या मॉडेल्सपैकी सर्वात मोठा आयफोन असणार आहे.
मेड इन इंडिया असणार iPhone 12
गेल्या काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या एका रिपोर्टनुसार, अॅपल iPhone 12 लाइनअप भारत तयार करण्यात येणार आहे. कंपनी iPhone चं मेड इन इंडिया मॉडेल आपल्या बंगळुरुच्या प्लांटमध्ये तयार करणार आहे. याची विक्री पुढच्या वर्षी करण्यात येणार आहे. भारतातच या फोनचं प्रोडक्शन होणार असल्यामुळे किंमत कमी होऊ शकते. भारतात iPhone 12 चं प्रोडक्शन ऑक्टोबर 2020 पासून सुरु करण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
मोबाईलमध्ये डार्क मोड वापरताना काळजी घ्या, डोळ्यांना त्रास होऊ नये म्हणून 'हे' करा
Redmi 9A | प्रतीक्षा संपली, भारतात 'या' तारखेला लॉन्च होणार हा स्वस्तात मस्त फोन