भारतात PUBG कमबॅक करणार? डिस्ट्रिब्युशन संदर्भात Jio सोबत बोलणी सुरु
भारतात पब्जीवर घालण्यात आलेली बंद उठवली जाऊ शकते. त्यासंदर्भात रिलायन्स जियोसोबत बोलणी सुरू असल्याची माहिती साउथ कोरियन कंपनी ब्ल्यू होल स्टूडियोच्या एका ब्लॉग पोस्टमधून देण्यात आली आहे.
मुंबई : काही दिवसांपूर्वी भारत सरकारने PUBG Mobile गेमवर संपूर्ण देशात बंदी घातली. त्यामुळे पब्जी प्रेमींमध्ये प्रचंड निराशा पसरली आहे. पण आता त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतात लवकरच पब्जी पुन्हा कमबॅक करू शकतं. भारतात पब्जीवर घालण्यात आलेली बंद उठवली जाऊ शकते. पब्जी मुळात साउथ कोरियन कंपनी ब्ल्यू होल स्टुडियोचा गेम आहे. बॅन केल्यामुळे पब्जी कंपनी चीनी कंपनी Tencent कडून ब्ल्यू होल स्टुडियोने पब्जी मोबाईल फ्रेंचायजी परत घेतली आहे. तसेच ब्ल्यू होल स्टुडियो आणि रिलायंस जियो यांच्यात डिस्ट्रिब्यूशन संदर्भात बोलणी सुरु आहेत.
जियोसोबत होऊ शकतो करार
ब्लू होल स्टूडियोच्या एका ब्लॉग पोस्टमधून समजलं आहे की, कंपनी भारतात गेम डिस्ट्रिब्यूशनसाठी रिलायन्स जियोसोबत डील करू शकते. आताच यासंदर्भात बोलणी सुरू झाली आहे. दरम्यान, अद्याप यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
भारतात बॅन झाल्यानतंर PUBG Corp.च्या वतीने प्रतिक्रिया देण्यात आली आहे. ज्यामध्ये सांगण्यात आलं आहे की, चिनी कंपनी Tencent Games कडून भारतात गेम पब्लिश करण्याचे राइट्स काढून घेतले आहेत. त्यामुळे कंपनी आता भारतात गेम ऑफर करून शकत नाही. परंतु, PUBG Corp. साऊथ कोरियन कंपनी आहे, जी भारतात डायरेक्ट गेम ऑफर करू शकते. PUBG Corp.च्या वतीने देण्यात आलेल्या या माहितीमुळे पब्जीप्रेमींच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत. त्यामुळे आता भारतात पुन्हा एकदा PUBG गेम कमबॅक करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
118 अॅप्स बॅन
भारत सरकारने काही दिवसांपूर्वी युजर्ससोबतच देशाच्या सुरक्षेला धोका असल्याचं सांगत 118 मोबाईल अॅप्सवर बंदी घातली होती. बंदी घालण्यात आलेल्या या अॅपस्मध्ये अनेक नावाजलेल्या आणि लोकप्रिय अॅप्सचा समावेश होता.
महत्त्वाच्या बातम्या :