'या' दोन कलर ऑप्शनसोबत लॉन्च होऊ शकतो iPhone 12; जाणून घ्या संपूर्ण स्पेसिफिकेशन्स
Apple आपला नवा आयफोन चार व्हेरियंट्ससोबत मार्केटमध्ये लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. एका नव्या रिपोर्टमधून iPhone 12 च्या कलर्सबाबतही खुलासा झाला आहे. कंपनी iPhone 12 सीरीजला रेड आणि नेव्ही ब्ल्यू कलर ऑप्शनसोबत मार्केटमध्ये लॉन्च करू शकते.
मुंबई : Apple चा iPhone 12 लॉन्च होण्याची युजर्स वाट पाहत आहेत. अशातच लॉन्च होण्याआधी याचं डिझाइन, किंमत आणि इतर स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. तसेच आयफोन 12 च्या कलर्सबाबतही खुलासा झाला आहे. कंपनी iPhone 12 सीरीजला रेड आणि नेव्ही ब्ल्यू कलर ऑप्शनसोबत मार्केटमध्ये लॉन्च करू शकते. iPhone X सीरीजनंतर अॅपलने रेड आयफोन लॉन्च केलेला नाही.
4 व्हेरियंट्समध्ये होणार iPhone 12 लॉन्च
Apple आपला नवा आयफोन चार व्हेरियंट्ससोबत मार्केटमध्ये लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. यामध्ये iPhone 12, iPhone 12 Max, iPhone 12 Pro आणि iPhone 12 Pro Max या व्हेरियंट्सचा समावेश आहे. बेस मॉडलमध्ये 5.4 इंचाचा डिस्प्ले असणार आहे. याव्यतिरिक्त 6.1 इंच का iPhone 12 ज्यामध्ये लो-एंड स्पेक्स आणि दुसरा हाय-एंड स्पेक्ससह 6.1 इंच डिस्प्ले असणार आहे. iPhone 12 संदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा रंगल्या आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी झालेल्या अॅपल इव्हेंटमध्येही iPhone 12 लॉन्च होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतु, त्या इव्हेंटमध्ये कंपनीकडून iPhone 12 लॉन्च करण्यात आला नसल्याने आयफोन प्रेमींमध्ये निराशा पसरली होती.
असा असू शकतो iPhone 12 चा लूक
एका रिपोर्टमध्ये खुलासा करण्यात आला आहे की, iPhone 12 ची डिझाइन iPhone 4 शी मिळती जुळती असू शकते. iPhone 4 अॅपलने 2010 मध्ये लॉन्च केला होता. नव्या आयफोनमध्ये कर्व्ड एज ऐवजी फ्लॅट एज असू शकतात. Apple ने iPad Pro मध्येही असचं डिझाइन दिलं होतं. असं सांगण्यात येत आहे की, नव्या iPhone मध्ये स्टेनलेस स्टीलच्या कडाही देण्यात येणार आहेत. परंतु, अद्याप कंपनीकडून यासंदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे iPhone 12 साठी युजर्सना आणखी काही काळ वाट पाहावी लागू शकते. वेगवेगळ्या रिपोर्ट्समधून अशी माहिती समोर येत आहे की, आयफोन प्रोडक्शनसाठी उशीर झाल्यामुळे अॅपलच्या यावर्षीच्या लॉन्च इव्हेंटला उशीर होऊ शकतो. तसेच आता कंपनीच्या वतीने सांगण्यात आलं आहे की, iPhone 12 लॉन्च होण्यासाठी यावेळी थोडा उशीर होणार आहे.
पहिला 5G iPhone असणार iPhone 12
मार्केटमध्ये अनेक फोन 5G टेक्नॉलॉजीसोबत लॉन्च करण्यात आले आहेत. Apple ची iPhone 12 सीरीज पहिली 5G सीरीज असणार आहे. Apple चे विश्लेषक मिंग-ची कूओ यांनी दिलेल्या माहितीनुसार, iPhone 12 च्या चारही व्हेरियंट्स 5G सपोर्टेबल असणार आहेत. परंतु, फक्त हाय एंड प्रो लेव्हल मॉडलमध्येच फास्टेस 5G स्पीड सपोर्ट करणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :