एक्स्प्लोर

मोठी बातमी : ST ची आजपासून भाडेवाढ, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची 'एबीपी माझा'ला माहिती!

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाकडून देण्यात आलेल्या भाडेवाढीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली असून आजपासून एसटीची भाडेवाढ लागू झाली असल्याची माहिती पुढे आली आहे.

मुंबई: एकीकडे टॅक्सी आणि रिक्षा चालक संघटनांकडून प्रवास भाडेवाढीचा प्रस्ताव देण्यात आला आहे. तर, दुसरीकडे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाकडून देण्यात आलेल्या भाडेवाढीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आला आहे. त्यामुळे आता नव्या वर्षात एसटीचा प्रवास महागण्याची शक्यता जवळ जवळ निश्चित झाले आहे. परिणामी आजपासून एसटीची भाडेवाढ लागू झाली असल्याची माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. 

नुकत्याच झालेल्या राज्य परिवहन प्राधिकरणाच्या (एसटीए) बैठकीत 14. 95 टक्के तिकीट दरवाढीला मंजुरी मिळाली असून त्यासंदर्भातील अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली होती. रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीबाबत निर्णय झालेला असला तरी त्याबाबत स्पष्टपणे सांगण्यात आलेले नाही. तर दुसरीकडे एसटीचा प्रवास महागण्याची शक्यता वर्तवली जात असताना त्याचा बोजा आता सर्वसामान्यांच्या खिशाला पडणार आहे.   

दरवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी, सर्वसामन्यांच्या खिशाला झळ?

परिवहन विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एसटीएची बैठक झाली. बैठकीत एसटीच्या तिकीट दरवाढीला मंजुरी देण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. एसटी महामंडळाने सुमारे 14.95 टक्के भाडेवाढ करण्याची मागणी केली होती, तर ऑटोरिक्षा आणि टॅक्सी भाडे संघटनांनी मुंबईत 3 रुपयांनी वाढ करण्याची मागणी केली होती. त्यामुळे ऑटोरिक्षाचे किमान भाडे 23 रुपयांवरून 26 रुपये आणि किमान टॅक्सी भाडे 28 रुपयांवरून 31 रुपये होऊ शकते. टॅक्सी आणि ऑटोसाठी शेवटची भाडेवाढ ऑक्टोबर 2022 मध्ये करण्यात आली होती, परंतु याबाबत अधिकृत निर्णय झाला नसल्याचे अधिकारी म्हणाले. एसटी कर्मचाऱ्यांचे वाढलेले पगार, इंधनाचे दर, सुट्या भागांच्या वाढलेल्या किमती यामुळे भाडेवाढ करणे गरजेचे असल्याचे सांगत एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाने भाडेवाढीला मंजुरी दिली होती.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची 'एबीपी माझा'ला माहिती!

मंत्रालयात नुकतीच प्राधिकरणाची बैठक पार पडली. यात लोकप्रतिनिधींचा सहभाग नसतो गृहमंत्रालयाचे प्रधान सचिव आणि अर्थ खात्याचे प्रधान सचिव यांचा या बैठकीत समावेश असतो. काल म्हणजेच 23 जानेवारीला  दुपारच्या सुमारात ही बैठक पार पडली असून या बैठकीत हा निर्णय झाला आहे की, तिला अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली एसटी दरवाढीबाबत 14.95 टक्के इतकी वाढ झाली आहे. तर रिक्षा आणि टॅक्सी  यांची दरवाढ ही एक फेब्रुवारीपासून लागू होणार असून ती 3 रुपयांनी वाढवली आहे. दिवसेंदिवस डिझेल, सिएनजी, एसटीचे सुटे पार्ट, इत्यादी गोष्टींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे दरवर्षी ही दरवाढ अपेक्षित असते. मात्र मागील तीन वर्षापासून ही दरवाढ झालेली नाही. परिणामी ही दरवाढ करण्यात आली असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार, संजय राऊतांचा मोठा दावा, म्हणाले, शिंदेंच्या पक्षातील...
महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार, संजय राऊतांचा मोठा दावा, म्हणाले, शिंदेंच्या पक्षातील...
Bank Holidays February: फेब्रुवारीत बँका 14 दिवस बंद राहणार, बँकांमधील कामाचं नियोजन करण्यापू्र्वी जाणून घ्या संपूर्ण यादी
फेब्रुवारीत बँका 14 दिवस बंद राहणार, बँकांमधील कामाचं नियोजन करण्यापू्र्वी जाणून घ्या संपूर्ण यादी
Sharad Pawar : महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार? शरद पवारांचं मिश्कील भाष्य; म्हणाले, मी त्याचीच वाट बघतोय!
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार? शरद पवारांचं मिश्कील भाष्य; म्हणाले, मी त्याचीच वाट बघतोय!
FIR Against Shreyas Talpade: अभिनेता श्रेयस तळपदे विरोधात FIR; मल्टी लेवल मार्केटिंगचं प्रकरण, कोट्यवधींची झालीय फसवणूक
मोठी बातमी! अभिनेता श्रेयस तळपदे विरोधात FIR; मल्टी लेवल मार्केटिंगचं प्रकरण, कोट्यवधींची झालीय फसवणूक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nalasopara Unauthorized Buildings  : नालासोपाऱ्यात सलग दुसऱ्या दिवशी अनधिकृत इमारतींवर तोडक कारवाईSharad Pawar Full PC : दावोसला उद्योगमंत्री गुंतवणूक आणण्यासाठी गेले की पक्ष फोडण्यासाठी ?Santosh Deshmukh Case Update : संतोष देशमुखांना 41 इंचाच्या गॅस पाईपने मारहाण केल्याचं उघडABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 24 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार, संजय राऊतांचा मोठा दावा, म्हणाले, शिंदेंच्या पक्षातील...
महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार, संजय राऊतांचा मोठा दावा, म्हणाले, शिंदेंच्या पक्षातील...
Bank Holidays February: फेब्रुवारीत बँका 14 दिवस बंद राहणार, बँकांमधील कामाचं नियोजन करण्यापू्र्वी जाणून घ्या संपूर्ण यादी
फेब्रुवारीत बँका 14 दिवस बंद राहणार, बँकांमधील कामाचं नियोजन करण्यापू्र्वी जाणून घ्या संपूर्ण यादी
Sharad Pawar : महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार? शरद पवारांचं मिश्कील भाष्य; म्हणाले, मी त्याचीच वाट बघतोय!
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार? शरद पवारांचं मिश्कील भाष्य; म्हणाले, मी त्याचीच वाट बघतोय!
FIR Against Shreyas Talpade: अभिनेता श्रेयस तळपदे विरोधात FIR; मल्टी लेवल मार्केटिंगचं प्रकरण, कोट्यवधींची झालीय फसवणूक
मोठी बातमी! अभिनेता श्रेयस तळपदे विरोधात FIR; मल्टी लेवल मार्केटिंगचं प्रकरण, कोट्यवधींची झालीय फसवणूक
Sharad Pawar : खरं म्हणलं तर हे काय कोल्हापूरचे संस्कार वाटत नाहीत, अमित शाह कोल्हापूरला शिकले की आणखी कुठं माहिती नाही : शरद पवार
अमित शाह यांचा टोन अतिटोकाचा, गृहमंत्र्यांकडून तारतम्यानं भाष्य अपेक्षित पण... शरद पवारांची टीका
Santosh Deshmukh Case Update : संतोष देशमुखांना 41 इंचाच्या गॅस पाईपने मारहाण केल्याचं उघड
Santosh Deshmukh Case Update : संतोष देशमुखांना 41 इंचाच्या गॅस पाईपने मारहाण केल्याचं उघड
Bapu Andhale Case : वाल्मिक कराडचा आणखी एक कारनामा समोर! महादेव गित्तेंवर हल्ला करण्यात हात, बापू आंधळे प्रकरणातील 'तो' व्हिडिओ जितेंद्र आव्हाडांकडून शेअर
वाल्मिक कराडचा आणखी एक कारनामा समोर! महादेव गित्तेंवर हल्ला करण्यात हात, बापू आंधळे प्रकरणातील 'तो' व्हिडिओ जितेंद्र आव्हाडांकडून शेअर
Pushpa 2 Box Office Collection Day 50: 'पुष्पा 2'चं बॉक्स ऑफिसवर अर्धशतक; रिलीजच्या 50व्या दिवशीही पुष्पाभाऊनं भल्याभल्यांना रडवलं, कमाई किती?
'पुष्पा 2'चं बॉक्स ऑफिसवर अर्धशतक; रिलीजच्या 50व्या दिवशीही पुष्पाभाऊनं भल्याभल्यांना रडवलं, कमाई किती?
Embed widget