एक्स्प्लोर
शंकर महादेवन यांच्या काळजात कट्यार नव्हे ट्रॅफिक घुसले!
प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांना मुंबईच्या ट्रॅफिकनं आपला झटका दाखवलाय. नवी मुंबईहून अंधेरीसाठी यायला निघालेले शंकर हे तब्बल तीन तासांच्या प्रवासानंतर अंधेरीच्या आसपासही पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे त्यांना ठरलेलं रेकॉर्डिंग रद्द करून घरी परतावं लागलं. या अनुभवाबद्दल त्यांनी ट्विटही केलंय. त्यांच्या फॅन्स आणि फॉलोवर्सनीही त्यांचं मिश्लिलपणे सांत्वन केलं.
![शंकर महादेवन यांच्या काळजात कट्यार नव्हे ट्रॅफिक घुसले! singer shankar mahadevan couldnt reach andheri despite 3 hours of commute शंकर महादेवन यांच्या काळजात कट्यार नव्हे ट्रॅफिक घुसले!](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/09/16170153/shankar-mahadevan.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: 'कट्यार काळजात घुसली' या सिनेमात 'राजगायक' या उपाधीसाठी शास्त्री बुवा (शंकर महादेवन) आणि खाँ साहेब (सचिन पिळगावकर) यांच्यात झालेल्या दुसऱ्या सामन्यात शास्त्रीबुवा हरतात आणि खाँ साहेब राजगायक ठरतात. हे आपण सर्वांनीच पाहिलंय. आता ती होती सिनेमाची (मुळातल्या संगीत नाटकाची) कथा. मात्र, समजा असाच मुकाबला आजच्या काळात याच दोघांमध्ये मुंबईतल्या अंधेरीत आयोजित केला गेला असता ना...तर महागुरू सचिन पिळगावकरच जिंकले असते! आणि त्याला कारण गायन नाही तर दोघांच्या घरापासूनचं अंतर कारणीभूत ठरलं असतं! कारण, शंकर महादेवन नवी मुंबईहून निघून अंधेरीला पोहोचूच शकले नसते आणि अंधेरी परिसरातच राहणाऱ्या सचिन यांनी विनामुकाबलाच स्पर्धा जिंकली असती.
आता हे वाचून तुमचा गोंधळ होणं स्वाभाविक आहे. त्यातला सचिन पिळगावकरांचा उल्लेख फक्त उदाहरणापुरता. खरा किस्सा आहे तो आज प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांना नवी मुंबईहून अंधेरीला पोहोचण्यात झालेल्या प्रचंड उशीराचा आणि त्यांच्या रद्द झालेल्या रेकॉर्डिंगचा. स्वत: शंकर महादेवन यांनीच ट्विट करून आपल्यावर ओढावलेला प्रसंग सांगितला आहे. त्याचं झालं असं की, शंकर यांना कुठल्याशा रेकॉर्डिंगसाठी अंधेरीला यायचं होतं. ते स्वत: राहतात नवी मुंबईला. तिथून सकाळी १० वाजता निधून तब्बल तीन तासाचा प्रवास करूनही ते अंधेरीच्या आसपासही पोहोचू शकले नाहीत. अखेर नाईलाजानं त्यांना रेकॉर्डिंग रद्द करून घरी परतावं लागलं. म्हणजेच, ज्या नवी मुंबईहून लोणावळ्याला अर्ध्या तासात आणि पुण्यात अडीच तासात पोहोचता येतं तिथून अंधेरीला मात्र तीन तास खर्चूनही गडी गाडीतच!
हे झालं शंकर महादेवन यांचं. मात्र, अशाच अनुभवातून नाट्यकलाकार प्रशांत दामले हेही गेले. त्यांनी तर कल्याणच्या स्थानिक प्रशानाचे वाभाडे काढले. एकूणच, या निमित्तानं सर्वसामान्यांना दररोज होणाऱ्या त्रासाचा अनुभव शंकर महादेवन यांनाही आला. महादेवन किमान आपल्या आरामदायी गाडीत प्रवास करू शकतात, ठरलेलं रेकॉर्डिंग रद्दही करू शकतात. मात्र, तुमच्या-आमच्यासारख्या सर्वसामान्यांच्या भाळी येतो तो ऑफिसमधला लेटमार्क किंवा बॉसची बोलणी. चला....आपण आपलं समाधान करून घ्यायचं की आपल्या रोजच्या जगण्याच्या लढायांचा ट्रेलर सेलेब्रिटिंनाही पाहता आला!
यानंतर शंकर महादेवन यांनी हा किस्सा ट्विटद्वारे शेअर केला. फॉलोवर्सनीही त्यांना एक से एक मजेशीर प्रतिसाद दिलाय. 'कधी कधी वाटतं गाडीऐवजी 'बाहुबली'तल्या भल्लालदेवासारखा रथ घ्यावा', 'एअर टॅक्सी हाच आता पर्याय आहे, कुणीतरी या संधीचा विचार करावा' अशा अफलातून कल्पना कुणाला सुचल्यात. तर, 'रात्रीच निघत जा घरून', 'एक हेलिकॉप्टर घेऊन टाका', 'लोकल ट्रेन वापरा', 'पुण्यातच आता मुक्काम ठेवा, तिथंच स्टुडिओ आणि तिथंच रेकॉर्डिंग' असे सल्लेही लोकांनी दिलेत. ट्रेननं प्रवास करण्याचा सल्ला तर अनेकांनी दिलाय. अनेकांनी प्रशासन आणि राजकारण्यांवरही टीका केलीये.Left Navi mumbai at 10 am and after three hours had reached nowhere close to Andheri ! Came back home and cancelled the recording !!! I really don’t know how to schedule things in this traffic condition in mumbai ?
— Shankar Mahadevan (@Shankar_Live) September 16, 2019
![शंकर महादेवन यांच्या काळजात कट्यार नव्हे ट्रॅफिक घुसले!](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/09/16165800/reply-1.jpg)
![शंकर महादेवन यांच्या काळजात कट्यार नव्हे ट्रॅफिक घुसले!](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/09/16165804/reply-2.jpg)
![शंकर महादेवन यांच्या काळजात कट्यार नव्हे ट्रॅफिक घुसले!](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/09/16165809/reply-3.jpg)
![शंकर महादेवन यांच्या काळजात कट्यार नव्हे ट्रॅफिक घुसले!](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/09/16165813/reply-4.jpg)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)