एक्स्प्लोर
बाबासाहेबांचं स्मारक लवकर होईल, फक्त ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी मनावर घ्यावं : शरद पवार
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं काम कित्येक वर्षांपासून रेंगाळलं आहे. महाविकास आघाडी सरकारनं या स्मारकासाठी आता तातडीनं पावलं उचलायला सुरुवाक केली आहे. आज याच पार्श्वभूमिवर शरद पवार यांनी या प्रस्तावित स्मारकाच्या जागेला भेट दिली. याआधी अजित पवार यांनी देखील भेट दिली होती.
मुंबई : दादर येथील इंदू मिलमध्ये होणारं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं काम लवकर होईल, फक्त ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी मनावर घ्यावं. येत्या दोन वर्षात बाबासाहेबांचं स्मारक पूर्ण होणं शक्य आहे, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे. इंदू मिलमध्ये होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रस्तावित स्मारकाच्या जागेची आणि आराखड्याची पाहणी शरद पवार यांनी आज केली. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने सत्तेत येताच अनेक महत्वाच्या कामांना गती देण्याचे काम सुरू केले असून त्यामध्ये इंदू मिल मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा समावेश आहे. या पार्श्वभूमिवर शरद पवार यांनी आज या ठिकाणची भेट घेतली.
प्रस्तावित स्मारकाच्या जागेची आणि आराखड्याची पाहणी केल्यानंतर शरद पवार म्हणाले की, मला आता सांगितलं गेलं आहे की स्मारकाचं 25 टक्के काम झालं अजून 75 टक्के काम करायचं बाकी आहे. ज्या कंपनीकडे काम आहे. ती आंतराष्ट्रीय पातळीवर काम करणारी संस्था आहे. त्यांनी मनापासून ठरवलं आणि कोणत्याही परवानग्या शिल्लक राहिल्या नाही तर दोन वर्षात काम करणं अशक्य नाही, असं पवार म्हणाले. त्यासाठी आव्हान म्हणून काम स्वीकारायला हवं. हे स्मारक महाराष्ट्राच्या पर्याटनाच्या दृष्टीने महत्वाचं ठरेल, असेही ते म्हणाले.
पवार म्हणाले, जगभरातील बौद्ध समाजात या स्मारकाचं आकर्षण राहील. चैत्यभूमी आणि स्मारक पाहिल्याशिवाय कोणी परत जाणार नाही. सहा डिसेंबर आणि 14 एप्रिलला इथं हजारो लोक येतात. स्मारक झाल्यानंतर प्रत्येक दिवशी इथं अनेक लोकं येतील, त्यावेळी गर्दीच्या काळात स्मारक परिसरात काळजी घ्यावी लागेल, असं ते म्हणाले.
आधीच्या सरकारने काम रखडवल्याबद्दल विचारलं असता ते म्हणाले की, आपण कुणावरही टीका टिपण्णी कशाला करायची. या स्मारकासाठी ज्याचा ज्याचा हातभार लागला असेल त्यांचे आभार. बाबासाहेबांचं स्मारक देशाबाहेर देखील आकर्षणाचं केंद्र ठरणार असल्याचे पवार म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी नुकताच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिलमधील प्रस्तावित स्मारकाच्या जागेची आणि आराखड्याची पाहणी केली होती आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन येत्या दोन वर्षांत इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभे करण्याचे जाहीर केले होते. त्याचवेळी अजित पवार यांनी या जागेची पाहणी शरद पवार करणार असल्याचे जाहीर केले होते.
संबंधित बातम्या
इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेबांच्या स्मारकाचा निधी वाडिया हॉस्पिटलसाठी द्या : प्रकाश आंबेडकर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement