Sarco Capsule: ना गळफास, ना आत्मदहन, आता आत्महत्येसाठीही मशीन, 5 मिनिटात विनात्रास मृत्यू, 'या' देशाची मंजुरी
Sarco Capsule: युरोपीय देश स्वित्झर्लंडमध्ये ही मशिन वापरण्यास तेथील प्रशासनाने परवानगी दिली आहे.
Sarco Capsule : अनेकांना आत्महत्या म्हटलं तरी अंगावर काटा येतो. गळ फास घेऊन, उंचावरून उडी मारून आणि नस कपून आत्महत्या केल्याचे प्रकार तुम्ही ऐकत असाल पण एका मशिनमध्ये जाऊन केवळ 5 ते 10 काही न करता लोकांना आत्महत्या करण्यास युरोपच्या (Europe) प्रशासनाने परवानगी दिली आहे. या मशिनचे नाव 'सार्को कॅप्सूल' (Sarco Capsule) असं आहे. ही मशिन 3 डी प्रिंटेड कॅप्सूल आहे. युरोपीय देश स्वित्झर्लंडमध्ये (switzerland) ही मशिन वापरण्यास तेथील प्रशासनाने परवानगी दिली आहे.
स्विसइन्फो यांच्या रिपोर्टनुसार, या मशिनच्या आत बसलेला व्यक्ती ही मशिन अॅक्टिव्ह करू शकतो. तसेच ही मशिन कोठेही घेऊन जाऊ जाता येते. स्विसइन्फोला दिलेल्या मुलाखतीमध्ये एक्झिट इंटरनेशनलचे संस्थापक डॉ. फिलिप निट्स्के (Dr Philip Nitschke) यांनी सांगितले, 'या मशिनमध्ये जाणाऱ्या व्यक्तीला मशिनमध्ये जाऊन झोपावे लागते. त्यानंतर त्या व्यक्तीला काही प्रश्न विचारले जातात. त्या प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर एका प्रोसेससाठी त्या व्यक्तीला एक बटण दाबाण्यासाठी थोडा वेळ दिला जातो. '
बेशुद्ध झाल्यानंतर 5-10 मिनिटांनी मृत्यू होईल
'सार्को कॅप्सूल' मशीनमधील एक बटण दाबल्यानंतर त्या मशिनमध्ये नायट्रोजन भरले जाते. त्यानंतर मशिनमधील ऑक्सिजन लेव्हल 30 सेकंदात 21टक्क्यावरून 1 टक्क्यावर जातो. त्यानंतर काही वेळेतच मशिनमधील व्यक्तीचा मृत्यू होतो. स्वित्झर्लंडमध्ये इच्छामरणाला कायदेशीर मान्यता देण्यात आली आहे. डॉ. फिलिप निट्स्के यांनी सांगितले, 'मशिनमधील व्यक्ती थोडा विचलीत होईल. त्यानंतर 5 ते 10 मिनीटानंतर त्या व्यक्तीचा मृत्यू होईल, '
इतर बातम्या :
Wifi Router : तुमचा वायफाय राऊटर धोक्यात?, 'या' कंपन्यांची नावं हॅकर्सच्या यादीत