(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Amazon Web Services outage : अॅमेझॉन वेब सर्व्हिसेसची सेवा काही काळासाठी खंडित, जगभरातून नेटिझन्सचा संताप
प्राईम व्हिडीओ, ई-कॉमर्स वेबसाइट या Amazon.com Inc च्या सेवा आणि अॅमेझॉन वेब सर्व्हिसेस (AWS) च्या अॅप्लिकेशन्सची सेवा 7 डिसेंबर रोजी युनायटेड स्टेट्समधील हजारो वापरकर्त्यांसाठी खंडित झाली.
Amazon Web Services outage : प्राईम व्हिडीओ, ई-कॉमर्स वेबसाइट या Amazon.com Inc च्या सेवा आणि अॅमेझॉन वेब सर्व्हिसेस (AWS) च्या अॅप्लिकेशन्सची सेवा 7 डिसेंबर रोजी युनायटेड स्टेट्समधील हजारो वापरकर्त्यांसाठी काही काळ खंडित झाली. त्यामुळे जगभरातून नेटिझन्सचा संताप व्यक्त करत आहेत.
अॅमेझॉनने सांगितले की, अॅप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस (एपीआय) शी संबंधित समस्यांमुळे सेवा खंडित झाल्याची शक्यता आहे, अॅप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस (एपीआय) हे अॅप्लिकेशन सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी आणि एकत्रित करण्यासाठी वापरला जाणारा प्रोटोकॉलचा एक संच आहे. अॅमेझॉनने आपल्या सेवा आरोग्य डॅशबोर्डवरील अहवालात म्हटले आहे की, आम्हाला US-EAST-1 प्रदेशात API आणि कन्सोल समस्या जाणवत आहेत.
Downdetector मध्ये असे दाखवण्यात आले आहे की, अॅमेझॉनच्या समस्यांची तक्रार 24,000 हून अधिक लोकांनी केली आहे. सेवा खंडित झाल्याची समस्या कदाचित मोठ्या संख्येने वापरकर्त्यांना जाणवत असेल. अॅमेझॉन कंपनीने सांगितले आहे की, त्यांनी समस्यांचे कारण शोधले आहे आणि ते ही समस्या सोडवण्यासाठी सक्रियपणे काम करत आहे.
हे अॅप्स वापरताना येत आहे अडचण
अॅमेझॉन वेब सर्व्हिसेसच्या रिपोर्टनुसार, Disney+, नेटफ्लिक्स, League of Legends, स्लॅक, टिंडर, McDonalds, Instacart, Robinhood आणि Coinbase तसेच अॅमेझॉन डिलेव्हरी अॅप या सर्व सेवा वापरताना लोकांनी समस्या येत आहेत.
अॅमेझॉनचे प्रवक्ते रिचर्ड रोचा यांनी एका निवेदनात सांगितले की, "अॅमेझॉनचे वेअरहाऊस आणि वितरण ऑपरेशन्स AWS आउटेजमुळे समस्या उद्भवत आहेत. त्यांनी पुढे सांगितले की, "कंपनी शक्य तितक्या लवकर समस्या सोडवण्यासाठी काम करत आहे."
इतर बातम्या :
Wifi Router : तुमचा वायफाय राऊटर धोक्यात?, 'या' कंपन्यांची नावं हॅकर्सच्या यादीत
Pizza Google Doodle : आज पिझ्झा का होतोय ट्रेंड? गुगलनंही बनवलंय भन्नाट डूडल!
New Volvo XC60 Review: व्होल्वोची नवी XC60 SUV, नव्या दमदार फिचर्ससह आरामदायी प्रवास
महागाईचा भडका उडणार? आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलच्या किंमतीत वाढ