Aung San Suu Kyi : म्यानमारच्या सर्वोच्च नेत्या आंग सान सू की यांना चार वर्षाचा तुरुंगवास, लष्कराविरोधात हिंसाचार भडकवण्याचा आरोप
Aung San Suu Kyi : म्यानमारच्या न्यायालयाने आंग सान सू की यांना चार वर्षाचा तुरुंगवास ठोठावला आहे. लष्कराविरोधात असंतोष भडकवण्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
Aung San Suu Kyi : म्यानमारच्या न्यायालयाने त्या देशाच्या नेत्या आंग सान सू की यांना लष्कराच्या विरोधात असंतोष भडकवण्याच्या आरोपाखाली चार वर्षाच्या कैदेची शिक्षा सुनावली आहे. त्याचसोबत कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचाही त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे.
नोबेल पुरस्कार विजेत्या 76 वर्षीय आंग सान सू की यांच्याविरोधात भ्रष्टाचार आणि इतर प्रकरणातही खटला सुरु आहे. आता त्यांना लष्कराच्या विरोधात असंतोष भडकवणे तसेच कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करण्याच्या आरोपाखाली चार वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. म्यानमारमध्ये 2023 साली निवडणुका घेण्याचे नियोजन आहे. पण एखाद्या व्यक्तीला शिक्षा झाली, त्याला तुरुंगवास झाल्यास राष्ट्राच्या सर्वोच्च पदी बसता येत नसल्याचा नियम आहे. त्यामुळे आता आंग सान सू की यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेवरून त्यांना यापुढची निवडणूक लढवता येणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
भारताचा शेजारी देश म्यानमारमध्ये या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात लोकशाही सरकार उलथवून लष्कराने पुन्हा एकदा सत्ता हाती घेतली आहे. सत्ता हाती घेतल्यानंतर आंग सान सू ची, राष्ट्रपती विन मिन्ट आणि अनेक महत्वाच्या नेत्यांना अटक केली होती. म्यानमारच्या कोर्टाने म्यानमारमधील बड्या नेत्या आंग सान सू की (Aung San Suu Kyi) यांच्या पक्षामधील दोन नेत्यांना 90 वर्ष आणि 75 वर्षाची शिक्षा सुनावली आहे. त्यांच्या भ्रष्टाचाराचे आरोप आहेत.
लोकशाही सरकार उलथवून लावणे आणि लष्कराची सत्ता प्रस्थापित करणे ही गोष्ट म्यानमारसाठी काही नवीन नाही . म्यानमारमध्ये या आधीही लष्कराची हुकुमशाही होती. त्या विरोधात प्रदीर्घ काळ लढा देऊन आंग सान सू ची यांनी लोकशाही मार्गाने सत्ता मिळवली होती. आता पुन्हा एकदा म्यानमारमध्ये लष्कराने सत्ता हाती घेतली आहे.
संबंधित बातम्या :
- Myanmar coup: म्यानमारमध्ये पुन्हा लष्करशाही; अमेरिकेची निर्बंध लावण्याची धमकी
- म्यानमारच्या आंग सान सू की यांच्या पक्षातील दोन सदस्यांना तब्बल 90 आणि 75 वर्षांची कैद
- In Pics: ती समोर ऐरोबिक्स करत होती, मागे लष्कर देशाची संसद ताब्यात घेत होतं.... व्हायरल होतोय म्यानमारचा हा व्हिडीओ
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha