एक्स्प्लोर
भाजपनं महाराष्ट्र आणि राजभवनाचा काळाबाजार केला : खासदार संजय राऊत
राष्ट्रवादीच्या पाच आमदारांच्या बदल्यात अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद दिलं असल्याचं देखील ते म्हणाले. अजित पवार काही मोठे नेते नाहीत. अजित पवारांना फोडणे हा भाजपचा शेवटचा डाव होता मात्र तो डाव फसला आहे. अजित पवारांना घेऊन सत्ता बनविण्याच्या भ्रमातून भाजपनं बाहेर यावं,
मुंबई : खोट्या कागदपत्रांच्या आधारे राज्यपालांनी सरकार बनवायला दिलं असून भाजपनं महाराष्ट्र आणि राजभवनाचा काळाबाजार केला असल्याची टीका शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे. सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजप आणि अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली. आम्हाला सत्ता स्थापनेसाठी 24 तासाचा वेळ दिला जातो. मात्र भाजपला बहुमत सिद्ध करायला 30 तारखेपर्यंत वेळ दिला. बहुमत आहे तर एवढा वेळ कशासाठी घेत आहेत. फोडाफोड करण्यासाठीच 30 तारखेपर्यंत मुदत दिली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
भाजपला व्यापारी समजत होतो पण त्यांचा व्यापार चुकला. भाजपनं सचोटीनं व्यापार करायला हवा होता असेही संजय राऊत म्हणाले. व्यापार प्रामाणिकपणे केला असता तर भाजपला अशी 'दर-दर की ठोकरे' खाण्याची वेळ आली नसती. भाजपनं राष्ट्रपती भवन आणि राजभवनात काळाबाजार केला. या देशात खालच्या स्तरावर राजकारण केलं जात आहे, याचं उदाहरण काल पाहायला मिळालं. बहुमत होतं तर चोरुन शपथविधी का केला?, असेही राऊत म्हणाले. तीन पक्षाच्या महाविकासआघाडीला 165 आमदारांचं बहुमत असल्याचं त्यांनी सांगितलं.
राष्ट्रवादीच्या पाच आमदारांच्या बदल्यात अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद दिलं असल्याचं देखील ते म्हणाले. अजित पवार काही मोठे नेते नाहीत. अजित पवारांना फोडणे हा भाजपचा शेवटचा डाव होता मात्र तो डाव फसला आहे. अजित पवारांना घेऊन सत्ता बनविण्याच्या भ्रमातून भाजपनं बाहेर यावं, असेही राऊत यावेळी म्हणाले.
आम्ही घाबरणारे नाहीत. हा त्यांचा शेवटचा खेळ आहे. आता त्यांचा खेळ संपला, असे राऊत म्हणाले. शरद पवार यांना महाराष्ट्र मानतो. अजित पवारांनी मोठी चूक केली. त्यांचा पक्ष फोडणे हे नैतिक नाही. असं करुन भाजपला काहीही फायदा होणार नाही. सीबीआय, ईडी, इनकम टॅक्स, पोलीस हे चार त्यांचे प्रमुख कार्यकर्ते आहेत. हे चार खेळाडू आणि राष्ट्रपती आणि राजभवन तर राखीव खेळाडू आहेत. या चौघाच्या जीवावर त्यांना जेवढा हैदोस घालायचा आहे तेवढा घालू द्या. या राज्याची जनता त्यांना भीक घालणार नाही. राज्यपाल आम्हाला एक न्याय देतात आणि भाजपला वेगळा न्याय देतात, असा आरोप देखील त्यांनी केला. आमच्या आमदारांना आता 10 मिनिटात जरी बहुमतासाठी बोलावलं तरी आम्ही बहुमत सिद्ध करु शकतो, असेही ते म्हणाले.
कालचा दिवस हा काळा दिवस होता. यापुढे इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीच्या दिवसाला काळा दिवस म्हणण्याचा भाजपला अधिकार नाही, असेही संजय राऊत म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
महाराष्ट्र
राजकारण
अहमदनगर
Advertisement