मोठी बातमी : विशाल पाटील सांगलीतून काँग्रेस पक्षाच्या वतीनेच भरणार उमेदवारी; पण...
Sangli Lok Sabha : विशाल पाटील मंगळवारी सांगली लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी त्यांच्याकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाण्याची शक्यता आहे.
Lok Sabha Election 2024 : सांगली लोकसभा मतदारसंघाबाबत (Sangli Lok Sabha Constituency) महाविकास आघाडीमधील (Maha Vikas Aghadi) तिढा काही सुटता सुटत नसल्याचे चित्र आहे. महाविकास आघाडीने सांगलीची (Sangli) जागा अधिकृतरीत्या शिवसेनेला सोडण्यात आल्याची घोषणा केली आहे. मात्र, अजूनही काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील (Vishal Patil) यांनी माघार घेतलेली नाही. पक्षाच्या नेत्यांनी अजूनही यावर फेरविचार करण्याची मागणी त्यांच्याकडून केली जात आहे. अशात आता विशाल पाटील मंगळवारी काँग्रेस पक्षाच्याच वतीने अर्ज भरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
काँग्रेस पक्षाकडून आपल्याला उमेदवारी मिळावी या मागणीवर विशाल पाटील आजही ठाम आहेत. तसेच त्यांचे समर्थक देखील यासाठी आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. अशात विशाल पाटील मंगळवारी सांगली लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी ते काँग्रेस पक्षाच्याच वतीने अर्ज भरणार आहेत. जर काँग्रेसच्या चिन्हावरच्या उमेदवारीचा निर्णय झालाच नाही, तर पुन्हा विशाल पाटील अपक्ष अर्ज भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची विशाल पाटील यांना अजूनही आशा असल्याचे पाहायला मिळत आहे.
विशाल पाटील करणार जोरदार शक्तिप्रदर्शन...
मागील काही दिवसांपासून सांगली लोकसभा मतदारसंघ प्रचंड चर्चेत आला आहे. महाविकास आघाडीत ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये या मतदारसंघावरून रस्सीखेच सुरु असल्याचे पाहायला मिळाले. पण अखेर हा मतदारसंघ ठाकरे गटाकडे गेला. मात्र, काँग्रेसकडून अजूनही विशाल पाटील इच्छुक आहेत. त्यामुळे मंगळवारी उमेदवारी अर्ज भरतांना विशाल पाटील समर्थकांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाण्याची शक्यता आहे. मंगळवारी गणपती मंदिर पासून काँग्रेस भवन पर्यंत रॅली काढून शक्तिप्रदर्शन करत विशाल पाटील अर्ज भरणार आहेत.
कार्यकर्त्यांनी रक्ताने लिहले पत्र....
सांगली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून विशाल पाटील यांना उमेदवारी मिळावी यासाठी त्यांचे समर्थक देखील प्रचंड आग्रही आहेत. अशात शनिवारी विशाल पाटील यांच्या उमेदवारीसाठी कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या रक्ताने विशाल पाटील यांना उमेदवारी मिळावी यासाठी पत्र लिहले. तसेच रक्ताने लिहलेले पत्र विशाल पाटील यांच्या कार्यालयाच्या समोर झळकवण्यात आले.
इतर महत्वाच्या बातम्या :