एक्स्प्लोर

Prakash Ambedkar: विशाल पाटलांनी सांगलीत लढायची हिंमत दाखवली तर पाठिंबा देऊ, निवडूनही आणू; प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

Maharashtra Politics: सांगलीच्या जागेवरुन ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये जुंपली आहे. या वादामुळे सांगली लोकसभेची जिंकू शकणारी जागा महाविकास आघाडीला गमवावी लागेल, अशी चिन्हे सध्या दिसत आहेत. प्रकाश आंबेडकरांचा विशाल पाटलांना पाठिंबा.

सांगली: गेल्या काही दिवसांपासून सांगली लोकसभेच्या जागेवरुन महाविकास आघाडीत तणावाचे वातावरण आहे. या जागेवरुन ठाकरे गटाने चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांना उमेदवारी घोषित केली आहे. परंतु, ही काँग्रेसची परंपरागत जागा असल्याचे सांगत विशाल पाटील (Vishal Patil) यांनी त्यांच्यासमोर शड्डू ठोकला आहे. विशाल पाटील यांनी आता सांगलीतून (Sangli Loksabha) अपक्ष लढण्याची तयारी सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे (VBA) सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी एक महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. विशाल पाटील हे सांगलीतून रिंगणातून उतरल्यास आपण त्यांना पाठिंबा देऊ, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.

प्रकाश आंबेडकर यांची शनिवारी नागपूरच्या उमरेड येथे सभा झाली. यावेळी त्यांनी सांगली लोकसभेच्या जागेबाबत भाष्य केले. या सभेत त्यांनी म्हटले की, चार दिवसांपूर्वी प्रतीक पाटील माझ्याकडे आले होते, काय करायचं विचारत होते. मी त्यांना म्हणालो की, हिंमत असेल, तर लढा. तुम्ही लढलात तर आम्ही तुम्हाला पाठींबा देतो. आता त्यांच्यात हिंमत आहे की, नाही पाहायचे आहे. ते लढले, तर पाठिंबाही देऊ आणि निवडून आणू, अशी ग्वाही देतो, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. 

प्रकाश आंबेडकर यांच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. अगोदरच मविआच्या चंद्रहार पाटील यांच्यासमोर भाजपच्या संजयकाका पाटील यांचे कडवे आव्हान आहे. संजयकाका पाटील यांच्या तुलनेत चंद्रहार पाटील हे राजकारणात नवखे आहेत. तसेच सांगली पट्ट्यात ठाकरे गटाची स्वत:ची अशी फारशी ताकद नाही. येथील बहुतांश आमदार काँग्रेस आणि शरद पवार गटाचे आहेत. अशात विशाल पाटील यांनी बंडखोरी करुन अपक्ष निवडणूक लढल्यास चंद्रहार पाटील यांच्यासाठी सांगलीतून निवडून येणे अत्यंत अवघड असेल. 

सांगलीत चंद्रहार पाटलांच्या प्रचारासाठी सभा; विश्वजीत कदम-सतेज पाटलांना निमंत्रण

शिवसेना उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ सोमवार 15 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजता सांगलीतील भावे नाट्य मंदिर येथे  महाविकास आघाडीचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या  या मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट  ताकदीने उपस्थित राहणार आहे. या मेळाव्यास जयंत पाटील, सतेज पाटील, विश्वजीत कदम यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. याचबरोबर महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांना तसेच इंडिया आघाडीच्या सर्व घटक पक्षांना मेळाव्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.

आणखी वाचा

विशाल पाटलांसाठी सांगली काँग्रेसमध्ये पहिली ठिणगी पडली; तालुका कॉंग्रेस कमिटी बरखास्तीचा ठराव!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Kolhapur News : एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Hingoli Shaktipeeth Mahamargशक्तिपीठ महामार्गाला हिंगोलीच्या शेतकऱ्यांचा विरोध, 24 जानेवारीला आंदोलनTop 70 News : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : 7AM : 18 Jan 2025 :  ABP MajhaAaditya Thackeray : धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यापासून मुख्यमंत्र्यांना कोण अडवतंय? ABP MAJHAABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 7 AM : 18 Jan 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Kolhapur News : एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Embed widget