(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sangli News : शेततळ्यात बुडून दोन सख्ख्या भावांचा करुण अंत, एकाला वाचवताना दुसराही बुडाला; सांगलीतील हृदयद्रावक घटना
Sangli News : सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील बेडगमधील शेततळ्यात सख्ख्या दोन चिमुरड्या भावडांचा बुडून दुर्दैवी अंत झाल्याची घटना घडली. कुटुंबाचा आधार गेल्याने संपूर्ण बेडग गावात शोककाळा पसरली आहे.
Sangli News : सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील बेडगमधील शेततळ्यात सख्ख्या दोन चिमुरड्या भावडांचा बुडून दुर्दैवी अंत झाल्याची घटना घडली. अयाज युनूस सनदी (वय 10) आणि आफान युनूस सनदी (वय 7) असे दुर्दैवी अंत झालेल्या बालकांची नावे आहेत. या घटनेनंतर सनदी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची नोंद मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे. अधिक तपास मिरज ग्रामीण पोलीस करत आहेत.
जिल्हा परिषद शाळा नागरगोजेवाडीत सख्खे भाऊ शिकत होते. शाळा सुटल्यावर घरी निघाले असताना गावातील नागरगोजे वस्तीवरील तलावाशेजारून जाताना लहान भावाचा पाय घसरला आणि तो पडला. त्यानंतर त्याला वाचवण्यासाठी मोठ्या भावाने पाण्यात उडी घेतली. यावेळी लहान भावाने मोठ्या भावाला मिठी मारल्याने दोघेही बुडाले. तलावात पाणी पाच ते सहा फूट असल्याने बुडालेल्या दोघा मुलांना बाहेर काढण्यात आले. मात्र, या दोन्ही मुलांची शरीराची हालचाल पूर्ण बंद पडली होती. तत्काळ सरपंच उमेश पाटील यांच्या रुग्णवाहिकेतून उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, या दोन्ही मुलांचा उपचारापुर्वीच अंत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. युनूस सनदी यांना अयाज आणि अफान दोन मुले होती. या कुटुंबाचा आधारच गेल्याने संपूर्ण बेडग गावात शोककाळा पसरली आहे.
आजीसमोर नातीचा विहिरीत पडून मृत्यू
दरम्यान, विहिरीतून पाणी काढत असताना शेजारीच बांधलेल्या म्हशीचा अचानक धक्का लागल्याने आजीसमोर नातीचा बुडून मृत्यू झाल्याची भीषण दुर्घटना कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur Crime) आजरा तालुक्यात घडली होती. अवघ्या 14 वर्षीय कार्तिकी सचिन सुतार (वय 14) या शालेय विद्यार्थिनीचा करुण अंत झाला होता. आजरा शहरातील भारत नगरमधील माद्याळकर यांच्या शेतातील विहिरीत पडून बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी (12 मार्च) चार वाजण्याच्या सुमारास घडली. कार्तिकी आजीसह शेतातील विहिरीतील पाणी काढून म्हैस धुवत होती. सोबत असलेली आजी बाजूला शेतात शेळ्या चारत होती. यावेळी शेजारीच असलेल्या झाडाला बांधलेली म्हैस अचानक फिरल्याने कार्तिकी थेट विहिरीत जाऊन कोसळली. ही घटना आजीच्या डोळ्यासमोर झाली. नात पडताच आजीने आरडाओरड सुरु केला, पण शेतामध्ये कोणीच नव्हते. काही वेळानंतर आजूबाजूचे नागरिक त्या ठिकाणी आले. मात्र, तोपर्यंत वेळ निघून गेली होती.
इतर महत्वाच्या बातम्या