Sadabhau Khot : लाडकी बहिण योजनेवरून सदाभाऊ म्हणतात, दुसऱ्याला मत देणाऱ्याची बायको नाराज होऊन घटस्फोट पण घेईल
गावभेट दौऱ्यानिमित्त आमदार सदाभाऊ खोत व गोपीचंद पडळकर यांची जत तालुक्यातील बऱ्याच गावात भेटीगाठी सुरु केल्या आहेत. गावभेटीदरम्यान सदाभाऊ खोत यांनी बुलेट सवारी करत जनतेमध्ये चर्चा केली.
![Sadabhau Khot : लाडकी बहिण योजनेवरून सदाभाऊ म्हणतात, दुसऱ्याला मत देणाऱ्याची बायको नाराज होऊन घटस्फोट पण घेईल On Ladaki Bahin Yojana mla Sadabhau say the wife of someone who votes for someone else will be upset and divorce her Sadabhau Khot : लाडकी बहिण योजनेवरून सदाभाऊ म्हणतात, दुसऱ्याला मत देणाऱ्याची बायको नाराज होऊन घटस्फोट पण घेईल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/29/17eb4aa55d9730dca6a2ad44b80708dd1727589290842736_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
सांगली : जर हे सरकार गेलं तर येणारे सरकार लाडकी बहीण योजना बंद करणार, त्यामुळे लाडकी बहीण नाराज होणार. दुसऱ्याला मत देणाऱ्याची बायको नाराज होऊन घटस्फोट पण घेईल, त्यामुळे याचा पश्चाताप नवरोबांना होणार आणि यासाठी मला आंदोलन करण्यासाठी या तालुक्यात यावं लागणार, अशी प्रतिक्रिया आमदार सदाभाऊ खोत यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील उमदीमध्ये दिली आहे. सदाभाऊ खोत म्हणाले की, या सरकारने शेतकऱ्यांना 12 हजार रुपये खात्याबरोबर वर्ग केले आहेत. तसेच लाडक्या बहिणीला दर महिन्याला पंधराशे रुपये देत आहे
आमदार सदाभाऊ खोत यांचा जत तालुक्याचा दौरा
दरम्यान, गावभेट दौऱ्यानिमित्त आमदार सदाभाऊ खोत व गोपीचंद पडळकर यांची जत तालुक्यातील बऱ्याच गावात भेटीगाठी सुरु केल्या आहेत. गावभेटीदरम्यान सदाभाऊ खोत यांनी बुलेट सवारी करत जनतेमध्ये चर्चा केली. खंडनाळ मंदिराच्या हॉलचे उद्घाटन करण्यात आले.आगामी विधानसभेसाठी एकच छंद गोपीचंद विधानसभा लढणार असल्याचे सदाभाऊ म्हणाले. या तालुक्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर व माझ्याकडून पाहिजे तेवढा निधी देणार सदाभाऊ म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)