सांगलीत राष्ट्रवादीच्या माजी उपनगराध्यक्षांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा; माजी खासदारांच्या PA ला शिवीगाळ, मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
Kavathe Mahankal Crime : माजी खासदार संजयकाका पाटील यांचे स्वीय सहायक खंडू होवाळ यांनीही जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण केल्याप्रकरणी अय्याज मुल्ला यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.
Kavathe Mahankal Crime : सांगली : सांगलीच्या (Sangli News) कवठेमहांकाळमधील (Kavathe Mahankal) राष्ट्रवादीचे माजी उपनगराध्य अय्याज मुल्ला यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी खासदाराच्या स्वीय सहायकाला मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. दरम्यान, सध्या या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. दरम्यान, यापूर्वी कवठे महांकाळमधील राष्ट्रवादीच्या माजी उपनगराध्यक्षांना मारहाणीप्रकरणी माजी खासदार संजय काका पाटील यांच्यासह 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता माजी खासदारांच्या स्वीय सहाय्यकाला मारहाण करत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माजी खासदार संजय काका पाटील (Sanjay Kaka Patil ) आणि त्यांच्या समर्थकांवर कवठेमहांकाळ मधील राष्ट्रवादीचे नेते माजी उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला यांना घरात घुसून मारहाण केल्या प्रकरणी कवठेमंहाकाळ पोलीस ठाण्यामध्ये रात्री गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता माजी खासदार संजयकाका पाटील यांचे स्वीय सहायक खंडू होवाळ यांनीही जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण केल्याप्रकरणी अय्याज मुल्ला यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. यामुळे कवठेमहांकाळमधील वातावरण चांगलंच तापलं आहे. कवठेमहांकाळ नगरपंचायत मध्ये माजी खासदार संजय पाटील गटाला नगराध्यक्ष निवडीसाठी मदत करत असलेल्या सगरे गटाच्या नगरसेविका अनुराधा सगरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा द्या, असं माजी उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला यांनी सांगितलं आहे. याविषयीचा राग मनात धरून माजी खासदार पाटील यांनी मुल्ला यांना याचा जाब विचारला. त्यानंतर या वादाला सुरुवात झालीय. मुल्ला यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होण्याबरोबरच कवठेमहांकाळ बाजार समितीचे माजी सभापती दादासाहेब उर्फ पिंटू कोळेकर, शहराध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या नवीन नगराध्यक्ष निवडीवरून पुन्हा एकदा या पारंपरिक दोन विरोधी गटात संघर्षाचा वणवा भडकला आहे.
कवठेमहांकाळ नगरपंचायतीची निवडणूक दोन ते अडीच वर्षांपूर्वी झाली. त्या निवडणुकीत माजी खासदार संजय पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे, महांकाली साखर कारखान्याच्या अध्यक्षा अनिता सगरे यांनी एकत्र येऊन आघाडी तयार केली. ही आघाडी विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे युवा नेते रोहित पाटील अशी निवडणूक झाली. या निवडणुकीत रोहित पाटील यांची एकहाती सत्ता आली. यावेळी त्यांच्या गटानं अश्विनी महेश पाटील यांना नगराध्यक्ष केलं. त्यांनी नेत्याच्या आदेशानं सहा महिन्यातच राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर परत नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लागली. या नगराध्यक्ष निवडीवेळी माजी खासदार संजय पाटील आणि रोहित पाटील यांच्यामध्ये अटीतटीचा संघर्ष बघायला मिळाला. माजी खासदार पाटील यांनी विरोधी गटाचे नगरसेवक फोडून आपल्या गटाचे वर्चस्व दाखवलं. सिंधुताई गावडे यांना नगराध्यक्ष केलं. गावडे यांनी संजय पाटील यांच्या आदेशानुसार नुकताच राजीनामा दिला. यावेळी परत निवडणुकीचा कार्यक्रम लागला असून अर्ज भरण्याच्या दिवशीच संजय पाटील आणि रोहित गटात संघर्ष सुरू झाला. 7 ऑक्टोबरला नगराध्यक्षपदाची निवड असून यामध्ये माजी खासदार की आमदार गट बाजी मारणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :