एक्स्प्लोर
रवी शास्त्रीवर गौतम गंभीरचा हल्लाबोल!
नवी दिल्ली: टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदाच्या वादानं आता नवं वळण घेतलं आहे. रवी शास्त्रींच्या आरोपावर गांगुलीनं पलटवार केल असताना आता क्रिकेटर गौतम गंभीरनं रवी शास्त्रीवर हल्लाबोल केला आहे.
'एबीपी न्यूज'शी बोलताना गंभीर म्हणाला की, 'आपण टीम इंडियाचे कोच नाही ही गोष्ट अजूनही शास्त्रींना पटलेली दिसत नाही. अनिल कुंबळे हे सर्वोत्तम टीम इंडियासाठी कोच म्हणून सर्वात योग्य व्यक्ती आहे आणि बीसीसीआयनं योग्य निवड केली आहे.'
याचवेळी बोलताना गंभीरनं रवी शास्त्रीवर हल्लाबोल केला आहे. 'त्यांनी टीमला आजवर किती विजय मिळवून दिले? शास्त्री प्रत्येक ठिकाणी आपल्या 18 महिन्यातील यशाबाबत फक्त बोलत आहेत. पण आपलं अपयश ते का लपवत आहेत?'
यावेळी गंभीर म्हणाला की, 'शास्त्री हे का सांगत नाहीत की, टीम इंडिया बांगलादेश बरोबरची सीरीज का हरली? तर भारतातच टीम इंडियाला द. आफ्रिकेनं धूळ चारली. तर आपल्या देशात आपल्याला विश्वचषक का गमवावा लागला? ते म्हणातत की, भारत कसोटीत 1 नंबर झाली, टी20 मध्ये नंबर वन झाली. त्यांनी मागील 18 महिन्यात टीम इंडियाला किती विजय मिळवून दिले आहेत?' असा सवालही गंभीरनं केलं आहे.
गंभीर म्हणाला की, 'भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदासाठी कुंबळे योग्य व्यक्ती आहे. तो एक झुंजार खेळाडू आहे आणि टीमसाठी कायम पुढे सरसावलेला असतो.'
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
राजकारण
राजकारण
क्राईम
Advertisement