एक्स्प्लोर

मोठी बातमी: छातीत दुखत असल्याने प्रकाश आंबेडकरांना पहाटे रुग्णालयात दाखल केलं, अँजिओग्राफी शक्यता

Prakash Ambedkar: प्रकाश आंबेडकर यांना छातीत दुखत असल्याने रुग्णालयात दाखल केले आहे. आंबेडकर यांच्यावर अँजिओग्राफी होणार असल्याची माहिती आहे.

पुणे: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांना छातीत दुखू लागल्याने आज (गुरुवारी,३१ ऑक्टोबरला) पहाटेच्या सुमारास पुण्यातील रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. प्रकाश आंबेडकर यांना छातीत दुखत असल्याने रुग्णालयात दाखल केले आहे. आंबेडकर यांच्यावर अँजिओग्राफी होणार असल्याची माहिती आहे. प्रकाश आंबेडकर यांची तब्येत सध्या स्थिर असल्याची माहिती पक्षातील प्रवक्त्यांनी दिली आहे.

हृदयात रक्ताची गाठ असल्याने त्यांना पुण्यातील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. पुढील ३ ते ५ दिवस त्यांच्यावर रुग्णालयात उपचार केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. पुढील ३-५ दिवस प्रकाश आंबेडकर रूग्णालयात डॉक्टरांच्या निरिक्षणात राहणार असल्याने, वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ताई ठाकूर, निवडणूक समन्वय समिती, जाहीरनामा समिती आणि माध्यम आणि संशोधन विभागाच्या सहकार्याने पुढील काही दिवस वंचित बहुजन आघाडीच्या प्रचाराचे नेतृत्व करणार आहेत.

वंचित बहुजन आघाडीच्या सोशल मिडिया अकाऊंटवरून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. "बाळासाहेब आंबेडकर यांना छातीत दुखू लागल्याने गुरुवार ३१ ऑक्टोबर रोजी पहाटे पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे".

बाळासाहेब आंबेडकर यांच्या छातीत दुखत असल्यामुळे त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून काही तासात त्यांची अँजिओग्राफी केली जाणार आहे अशी माहिती समोर आली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर आंबेडकरांना रूग्णालयात दाखल करण्यात आल्याने वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ताई ठाकूर प्रचाराचे नेतृत्व करणार आहेत.

काय म्हटलं आहे पोस्टमध्ये?

ॲड. प्रकाश आंबेडकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांच्यावर आय. सी. यू मध्ये उपचार सुरू आहेत.वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांना छातीत दुखू लागल्याने गुरुवारी पहाटे (३१ ऑक्टोबर) पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बाळासाहेब आंबेडकर यांच्या हृदयात रक्ताची गुठळी झाल्यामुळे त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, येत्या तासाभरात त्यांची अँजिओग्राफी करण्यात येणार आहेत. कुणीही प्रश्न विचारून व्यत्यय आणू नये. कुटुंबाच्या गोपनीयतेच्या विनंतीचा आदर करावा, अशी विनंती आंबेडकर कुटुंबियांकडून करण्यात आलेली आहे.

पुढील ३ ते ५ दिवस बाळासाहेब डॉक्टरांच्या  निरीक्षणात राहणार आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर, निवडणूक समन्वय समिती, जाहीरनामा समिती आणि माध्यम आणि संशोधन विभागाच्या सहकार्याने पुढील काही दिवस काम चालेल.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar: पवार कुटुंबीय दिवाळीला एकत्र दिसतील का? अजित पवार म्हणाले आपल्याला दिसेलचं, पण सुप्रिया ताईंसोबत भाऊबीज, दादांनी बोलणं टाळलं
पवार कुटुंबीय दिवाळीला एकत्र दिसतील का? अजित पवार म्हणाले आपल्याला दिसेलचं, पण सुप्रिया ताईंसोबत भाऊबीज, दादांनी बोलणं टाळलं
बाळासाहेबांची प्रकृती स्थिर, तुम्ही तुमचे मतदारसंघ सांभाळा; पुत्र सुजात यांनी दिली तब्येतीची माहिती
बाळासाहेबांची प्रकृती स्थिर, तुम्ही तुमचे मतदारसंघ सांभाळा; पुत्र सुजात यांनी दिली तब्येतीची माहिती
Nana Kate: अजितदादांच्या मनधरणीनंतर ही नाना काटे बंडखोरीवर ठाम; म्हणाले 'उमेदवारी मागे घेण्याबाबत...'
अजितदादांच्या मनधरणीनंतर ही नाना काटे बंडखोरीवर ठाम; म्हणाले 'उमेदवारी मागे घेण्याबाबत...'
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : दिंडोरीत नरहरी झिरवाळ विजयाची हॅट्ट्रीक करणार? की मविआ धक्का देणार?
विधानसभेची खडाजंगी : दिंडोरीत नरहरी झिरवाळ विजयाची हॅट्ट्रीक करणार? की मविआ धक्का देणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 31 OCT 2024 : ABP MajhaHarshwardhan Jadhav On Raosaheb Danve : घर फोडण्यामागे रावसाहेब दानवे,  हर्षवर्धन जाधवांनचा आरोपABP Majha Marathi News Headlines 02 PM TOP Headlines 02 PM 31 October 2024Prataprao Jadhav Political Phataka : राज्यातील राजकारणात सुतळी बॉम्ब एकनाथ शिंदे !- प्रतापराव जाधव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar: पवार कुटुंबीय दिवाळीला एकत्र दिसतील का? अजित पवार म्हणाले आपल्याला दिसेलचं, पण सुप्रिया ताईंसोबत भाऊबीज, दादांनी बोलणं टाळलं
पवार कुटुंबीय दिवाळीला एकत्र दिसतील का? अजित पवार म्हणाले आपल्याला दिसेलचं, पण सुप्रिया ताईंसोबत भाऊबीज, दादांनी बोलणं टाळलं
बाळासाहेबांची प्रकृती स्थिर, तुम्ही तुमचे मतदारसंघ सांभाळा; पुत्र सुजात यांनी दिली तब्येतीची माहिती
बाळासाहेबांची प्रकृती स्थिर, तुम्ही तुमचे मतदारसंघ सांभाळा; पुत्र सुजात यांनी दिली तब्येतीची माहिती
Nana Kate: अजितदादांच्या मनधरणीनंतर ही नाना काटे बंडखोरीवर ठाम; म्हणाले 'उमेदवारी मागे घेण्याबाबत...'
अजितदादांच्या मनधरणीनंतर ही नाना काटे बंडखोरीवर ठाम; म्हणाले 'उमेदवारी मागे घेण्याबाबत...'
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : दिंडोरीत नरहरी झिरवाळ विजयाची हॅट्ट्रीक करणार? की मविआ धक्का देणार?
विधानसभेची खडाजंगी : दिंडोरीत नरहरी झिरवाळ विजयाची हॅट्ट्रीक करणार? की मविआ धक्का देणार?
देवेंद्र तात्यांनी मला खूप काही शिकवलं; मनोज जरांगेंचं ठरलं, गणित जुळलं, सांगितला विजयाचा फॉर्म्युला
देवेंद्र तात्यांनी मला खूप काही शिकवलं; मनोज जरांगेंचं ठरलं, गणित जुळलं, सांगितला विजयाचा फॉर्म्युला
मनसेच्या दीपोत्सवाचा खर्च अमित ठाकरेंच्या निवडणूक खर्चात टाका, आचारसंहिता भंगाची ठाकरेंच्या शिवसेनेकडून तक्रार
मनसेच्या दीपोत्सवाचा खर्च अमित ठाकरेंच्या निवडणूक खर्चात टाका, आचारसंहिता भंगाची ठाकरेंच्या शिवसेनेकडून तक्रार
Tasgaon-Kavathe Mahankal Vidhan Sabha : तासगाव कवठेमहांकाळमध्ये रोहित पाटलांच्या विरोधात आणखी तीन रोहित पाटील रिंगणात!
तासगाव कवठेमहांकाळमध्ये रोहित पाटलांच्या विरोधात आणखी तीन रोहित पाटील रिंगणात!
ठाकरेंच्या शिवसेना उमेदवाराची डोकेदुखी वाढली; परभणीतही एकाच नावाचे तीन उमेदवार
ठाकरेंच्या शिवसेना उमेदवाराची डोकेदुखी वाढली; परभणीतही एकाच नावाचे तीन उमेदवार
Embed widget