Pune Crime News: पुण्यातील प्रोफेसरच्या मुलीवर सामूहिक अत्याचार, आरोपी बड्या बापाची मुलं, धंगेकरांच्या पत्राने एकच खळबळ
Pune Crime News: पुण्यातील प्रसिद्ध महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीवर चौघांनी वेगवेगळ्या ठिकाणी लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे, धंगेकर यांनी पुणे पोलिसांना लिहलेल्या पत्रामध्ये पिडीत मुलगी ही विशेष म्हणजे पीडित मुलगी ही एका प्राध्यापकाची मुलगी असल्याची माहिती समोर आली आहे.
पुणे: शिक्षणाचं माहेरघर आणि रांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात देखील गेल्या काही दिवसांपासून अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. दोन दिवसांपुर्वी शहरातील एका नामांकित महाविद्यालयात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर चौघांनी लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी मंगळवारी (दि. 24) कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात पोक्सोसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील प्रसिद्ध महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीवर चौघांनी वेगवेगळ्या ठिकाणी लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे, दरम्यान काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी पुणे पोलिसांना लिहलेल्या पत्रामध्ये पिडीत मुलगी ही विशेष म्हणजे पीडित मुलगी ही एका प्राध्यापकाची मुलगी असल्याची माहिती समोर आली आहे. प्राध्यापकाने याबाबतची तक्रार ट्रस्टींकडे केली होती, परंतु ट्रस्टींनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप धंगेकरांनी केला आहे.
आरोपींपैकी काही मुले मोठ्या बापांची मुलं?
बलात्कार करणाऱ्या मुलांपैकी काही मुले ही मोठ्या बापांची अवलाद असून त्यातील एक मुलगा हा उप-जिल्हाधिकारी (प्रांत-अधिकारी) यांचा मुलगा असून संस्थेचे ट्रस्टींशी त्यांच्याशी गैरमार्गाचे आर्थिक हितसंबंध आहेत. त्यामुळे आरोपी मुलाला वाचविण्याकरीता पीडित मुलीच्या वडिलांवर (प्राध्यापक) दबाव आणत आहे अशी चर्चा महाविद्यालयांतील सेवक वर्गात चालू आहे. त्यामुळे संस्थेचे ट्रस्टींशी आणि महाविद्यालयांचे अधिकारी यांची भूमिका ही अतिशय संशयास्पद आहे असे दिसून येते, असं काँग्रेस नेते आणि आमदार रविंद्र धंगेकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. यामुळे खरंंच पिडित मुलीच्या पालकांवर संस्थेने दबाव आणला का, बड्या बापाच्या मुलांना या प्रकरणी वाचवलं जात आहे का याचा सखोल तपास व्हावा अशी मागणी केली जात आहे.
कोरेगाव पार्क ड्रग्स पार्टी व महाविद्यालयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराची घटना अतिशय दुर्दैवी आहे.
— Ravindra Dhangekar Official (@DhangekarINC) September 26, 2024
शिक्षणाचे माहेरघर असणाऱ्या व राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यनगरीत घडणाऱ्या अश्या घटनांची मी नेहमी दखल घेत सखोलपणे या घटनांचा मागोवा घेत असतो, प्रत्येक… pic.twitter.com/w8t27CRM7S
नेमकं प्रकरण काय?
दोन दिवसांपुर्वी शहरातील एका नामांकित महाविद्यालयात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर चौघांनी लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी मंगळवारी (दि. 24) कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात पोक्सोसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, कोरेगाव पार्क पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये असणाऱ्या एका नामांकित महाविद्यालयामध्ये पीडित तरुणी शिक्षण घेते. तर आररोपी देखील याच महाविद्यालयात 11वी,12वीचे शिक्षण घेत आहेत. त्यातील एकाने पीडितेला पार्टीसाठी म्हणून आरोपींपैकी एकाच्या फ्लॅटवर नेले. तेथे गेल्यावर आरोपींनी ड्रगचे सेवन केले आणि पीडितेवर लैंगिक अत्याचार केला. घटनेनंतर घाबरलेल्या पीडितेने ही बाब तिच्या घरच्यांना सांगितल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. त्यानंतर पीडितेच्या पालकांनी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात धाव घेतली.
हा संपूर्ण प्रकार एप्रिल पासून घडत आला आहे. पीडित तरुणी तिच्या वडिलांच्या फोन वरून सोशल मीडिया वापरत होती आणि यावरूनच आरोपी तरुणांशी तिची मैत्री झाली. त्यानंतर तिच्यासोबत लैंगिक अत्याचार करण्यात आला. या संबधीचे व्हिडिओ देखील आरोपींनी काढल्याची माहिती आहे. दरम्यान, आरोपी तरुण हे एकमेकांना ओळखत नाहीत. पिडीत तरुणीला भेटण्यासाठी एकाने तिच्यावर महाविद्यालयात अत्याचार केले, तर दुसऱ्याने तिच्या घरी तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. इतर 2 तरुणांनी सुद्धा तिच्याशी अनेक ठिकाणी सबंध ठेवल्याची माहिती आहे. ही सर्व घटना पिडीत तरुणीने तिच्या मैत्रिणीला सांगितल्या तसेच महाविद्यालयात सुरू असलेल्या गुड टच बॅड टच अभियानात असलेल्या समुपदेशक यांना सांगितल्या. यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला आणि पालकांनी पोलिसात धाव घेतली. तर या प्रकरणात ड्रग्जचा काही संबध आला नसल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे.