Hardik Pandya On Paparazzi: 'प्रत्येकानं मर्यादा ओळखाव्यात...'; गर्लफ्रेंड माहिका शर्माच्या 'त्या' व्हिडीओमुळे हार्दिक पांड्या चिडला, पॅपाराझींना सुनावलं
Hardik Pandya On Paparazzi: हार्दिकने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक लांबलचक नोट शेअर केली आहे. या पोस्टमधून हार्दिक पांड्यानं पॅपाराझींना फटकारलं आहे.

Hardik Pandya On Paparazzi: भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Association) ऑलराउंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) पॅपाराझींवर प्रचंड चिडला आहे. काही दिवसांपूर्वी जया बच्चन (Jaya Bachchan) यांनी पॅपाराझींचा उल्लेख 'घाणेरडी पँट घालणारे उंदीर' असा केलेला. त्यानंतर मोठा गदारोळ झालेला. अगदी बच्चन फॅमिलीला बॉयकॉट करण्यापर्यंत प्रकरण पोहोचलं होतं. अशातच आता टीम इंडियाचा स्टार खेळाडू हार्दिक पांड्या पॅपाराझींवर संतापला आहे. त्यानं सोशल मीडियावर लांबलचक पोस्ट लिहून पॅपाराझींवरची नाराजी व्यक्त केली आहे. याचं कारण म्हणजे, हार्दिक पांड्याची गर्लफ्रेंड माहिका शर्माचा (Mahika Sharma) आक्षेपार्ह्य फोटो काढण्यात आला, जो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. त्यावरुन हार्दिक चिडला आणि 'सस्ती सनसनाटी फैलाने की कोशिश...', असं म्हटलं आणि त्यावरुन पॅपाराझींना (Hardik Pandya Slams Paparazzi) जोरदार फटकारलं.
हार्दिकने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर (Hardik Pandya Instagram Story) एक लांबलचक नोट शेअर केली, ज्यामध्ये त्यानं लिहिलंय की, तो कधीही विसरत नाही की, एक पब्लिक फिगर म्हणून, कॅमेरे आणि लाईमलाईट हा त्याच्या आयुष्याचा एक भाग आहे. दरम्यान, आज घडलेल्या घटनेनं त्याच्या मर्यादा ओलांडल्या. त्यानं स्पष्ट केलं की, "माहिका फक्त पायऱ्या उतरत होती, पण पॅपाराझींनी तिचा फोटो काढण्यासाठी असा अँगल निवडला की, जो कोणत्याही महिलेच्या प्रतिष्ठेच्या विरुद्धच मानला जाईल..."
हार्दिकनं स्पष्ट लिहिलंय की, "ही कोणाचीतरी 'पर्सनल मोमेंट'होती, जी यापद्धतीनं कॅप्चर करुन त्यावरुन नको ते पसरवण्याचा प्रयत्न करणं खूपच चुकीचं आहे. त्यानं म्हटलंय की, "पॅपाराझींना आपली जबाबदारी समजली पाहिजे आणि अशा अँगलनं शूट करणं त्यांनी टाळलं पाहिजे, जे एखाद्या महिलेला असुरक्षित वाटेल. हार्दिकनं हेसुद्धा म्हटलंय की, प्रत्येक व्यक्ती, मग तो सेलिब्रिटी असो किंवा नसो... त्याच्या खासगीपणाचा सन्मान केला गेलाच पाहिजे..."

हार्दिकची पोस्ट जशीच्या तशी (Hardik Pandya Social Media Post)
हार्दिकने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलंय की, "मला माहीत आहे की, पब्लिक फिगर म्हणून आमच्याकडे सर्वांचंच लक्ष वेधलेलं असतं. पण कधीकधी मर्यादा ओलांडली जाते. पण आज असं काही घडलं ज्यानं सर्व मर्यादाच ओलांडल्या... माहिका वांद्रे येथील एका रेस्टॉरंटमध्ये पायऱ्या उतरत होती, तेव्हा पॅपाराझींनी तिला अशा अँगलनं टिपण्याचा प्रयत्न केला की, जे अगदीच चुकीचं, आक्षेपार्ह्य होतं. एक खाजगी क्षण एका 'सस्ती सनसनी' बदलला गेला..."
हार्दिक पुढे म्हणाला की, "हे हेडलाईन किंवा कोणी काय क्लिक केलं याबद्दल नाही, ते मूलभूत आदराबद्दल आहे. महिलांना आदर मिळायला हवा. प्रत्येकानं मर्यादा निश्चित केल्या पाहिजेत. दररोज कठोर परिश्रम करणाऱ्या मीडिया बंधूंना, मी तुमच्या कठोर परिश्रमाचा आदर करतो आणि मी नेहमीच सहकार्य करतो. पण मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की, कृपया थोडी जास्त काळजी घ्या... सर्वकाही कॅप्चर करण्याची गरज नाही. प्रत्येक अँगलनं फोटो काढण्याची गरज नाही. या खेळात थोडी माणुसकी जपूयात... धन्यवाद."
View this post on Instagram
दरम्यान, हार्दिक पांड्यानं चिडून केलेल्या पोस्टनंतर आता सोशल मीडियावर वाद-विवाद सुरू झाले आहेत. अनेक युजर्सनी हार्दिक पांड्याला पाठिंबा देत म्हटलंय की, "पॅपाराझींनी त्यांच्या सीमा ओळखल्या पाहिजेत आणि बातम्यांसाठी कुणाच्याही प्रायव्हसीवर आक्रमण करू नये..." अद्याप या प्रकरणावर पॅपाराझींनी कोणतंही अधिकृत वक्तव्य केलेलं नाही.
माहिका शर्मा कोण? (Who Is Mahika Sharma?)
नताशासोबत घटस्फोट घेतल्यानंतर हार्दिकच्या आयुष्यात माहिकाची एन्ट्री झाली. हार्दिक पांड्या आणि माहिका एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत. माहिका हार्दिक पांड्यापेक्षा जवळपास आठ वर्षांनी लहान आहे. पांड्याचा जन्म 8 ऑक्टोबर 1993 रोजी गुजरातमधील चोरयासी इथे झालेला. तो सध्या 32 वर्षांचा आहे, तर माहिका 24 वर्षांची आहे. माहिका शर्मा मूळची दिल्लीची आहे. तिचं मॉडलिंग जगतात मोठं नाव आहे. माहिकानं इकोनॉमिक्स आणि फायनान्समध्ये डिग्री घेतलीय.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























